येथे शब्द पाळला जातो…. संग्रामसिंह (भाऊ) देशमुख
येथे शब्द पाळला जातो…. संग्रामसिंह (भाऊ) देशमुख
टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते स्व आमदार संपतरावआण्णा देशमुख यांचा वारसा ,व मा .आ .पृथ्वीराज देशमुख बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भाऊंची राजकीय , सामाजिक वाटचाल सुरू आहे, गेली अनेक वर्षांपासून सांगली जिल्हातील जनतेला एका लोकप्रतिनिधी कडुन ज्या अपेक्षा होत्या.त्या संग्रामभाऊंनी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहेत.
भाऊंनी जिल्हा परिषद च्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळापासुन सुरू केलेला जिल्हाभर विकासाचा झंझावात आजही सुरु आहे . त्यांच्या माध्यमातून जिल्हाभर कोट्यावधी रुपयांचे विकास काम झाली आहेत. त्यांची कामाची पद्धत ही खुप वाखण्यासारखी आहे .भाऊ कोणताही विषय हाती घेतला तर ते पुर्ण तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. याचा प्रत्येय हा प्रत्येक कार्यकर्त्यास येत असतो.
पलुस कडेगांव विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आजपर्यंत या मतदारसंघात गेले पंधरा वर्षात जेवढी विकास काम झाली नाहीत त्यांच्या दुप्पट कामे भाऊंच्या व बाबांच्या माध्यमातून मतदार संघात झाली आहेत , तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था एवढी झाली होती की खड्ड्यात रस्ता आहे की रस्तात खड्डा अशी अवस्था रस्त्याची होती पण भाऊंच्या व बाबांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे मतदारसंघाच मार्गी लागली आहेत.
जिल्हा परिषद च्या माध्यमातून , पशुसंवर्धन विभागामार्फत गरीब आणि गरजू लाभार्थीना ,शेळी ,गायी म्हशी गट वाटप चाप कटर , मुक्त गोटा , समाजकल्याण विभागाकडून गरीब लोकांना वसंत घरकुल , यशवंत घरकुल , पिठाच्या चक्की अंपग व्यक्तीला रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून मिरची काडंप डंग ,पिटाच्या चक्या , कृषी विभागामार्फत चाफकटर , विहीरीवरील मोटारी ,रोटावेटर , महीला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनीना सायकली , ओपन प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनींना सायकली तसेच संगणक प्रशिक्षण साठी एम एस सी आय टी कोर्स अशा अनेक योजनांचा लाभ आदरनीय भाऊंच्या माध्यमातून गरीब व आजपर्यंत कोणताही लाभ न मिळालेल्या वंचित लोकांना मिळाला आहे ,
भाऊंनी जिल्हा परिषद च्या माध्यमातून दिव्यांग अभियान राबवुन अनेक दिव्यांगांना ज्यांच्या कडे आजपर्यंत कोणी पाहीले नव्हते अशा लोकांना दिव्यांग अभियान च्या माध्यमातून जी मदत करता येईल ती त्यांनी केलीली आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरात कोणताही राजकीय स्वार्थ न पाहता कोणतेही चमकोगिरी न करता , कोणताही कँमेरामन सोबत न नेता , स्वता भाऊ महापुरात लोकांन धीर देऊन जी मदत करता येईल तेवढी करत होते .हे पलुस भागातील जनता विसरलेली नाही.
ही सर्व समाजसेवा करत असताना कार्यकर्तेला कधी दुजाभावाची वागणुक दिली नाही ,प्रत्येक सर्व सामान्य कार्यकर्त्याला भाऊ आपुलकीने वागणुक देत असतात .
मी आजपर्यंत असे नेते मी पाहिलेत की त्यांना गाडीतून उतरण्यासाठी फुरसत नसते कार्यकर्त्यांना ते गाडीच्या काचेतून हात करतात , पण अशा नेत्यांना भाऊ हे अपवाद ठरले आहेत. आजपर्यंत बरेच आले आणि गेले आणि पाच वर्षे आश्वासनाचा पाऊस पाडुन गेले ,पण भाऊनी ज्या दिवशीपासुन अध्यक्ष पदाचा कार्यभार घेतला होता तेव्हापासुन सर्व सामान्य माणसाच्या समस्या स्वता तळागाळात जाऊन समजून घेऊन त्याचे निरसरण करत आहेत आणि केलंय ,सर्व शासकीय योजना ह्या सर्वसामान्य लोंकापर्यत पोहचायला लागल्या .
आज एक ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी तो पांढरे शुभ्र कपडे घालून हायफाय हाँटेल मध्ये जातो ,पण एक जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांना राज्य मंत्र्यांचा दर्जा होता ते सर्व सामान्य लोकाबरोबर एका टपरीवर चहा पिताना अनेक वेळा लोकांनी पाहीलय यांच्यावरुन लक्षात येते कि ही माणुस किती साधा व सर्वसामान्य जनतेत मिसळणारा आहे .
माझ्या गावच्या अनेक समस्या घेऊन मी आदरणीय भाऊंच्या कडे जात असतो आजपर्यंत प्रत्येक समस्येचे निराकरण आदरणीय भाऊ करत असतात. माझ्या ढाणेवाडी गावच्या इतिहास एवढा निधी आला नाही तेवढा निधी त्यांनी ढाणेवाडीच्या विकास कामांसाठी दिलाय. जगावर कोरोना ने थैमान घातले होते अशा बिकट परिस्थिती मध्ये ढाणेवाडी गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे भाऊंना समजलं आम्ही त्यांच्याकडे जायच्या आधीच रात्री नऊ वाजता भाऊंचा मला फोन आला व सकाळी हिंगणगाव तलावाच्या माध्यमातून ढाणेवाडी गावाला पाणी सोडायच आहे असे सांगितले व सकाळी जँकवेल वर येण्यास सांगितले म्हणजे भाऊंना ना गावच्या समस्या सोडविण्यासाठी किती तळमळ आहे यातुन दिसुन येते . जर पिण्याच्या पाणी सोडले नसते तर ढाणेवाडी मधील लोकांना रानोमाळ पाण्यासाठी वणवण भटकावे लागले असते हे सत्य नाकारुन चालणार नाही.
कोरोनाने देशांसोबत राज्यात थैमान घातले होते कडेगांव तालुका मध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळले होते तरी देखील समाजसेवेचा वसा भाऊंनी सोडला नाही सोशल डिस्टन्स चे पालन करीत आपल्या जिवाची पर्वा न करता ते स्वता प्रत्येक गावास जाऊन भेट देऊध तेथील स्थानिक परिस्थितीची पाहणी करत होते व लोकांना घरातच राहून प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते व संबंधित प्रशासन आरोग्य विभाग यांनादेखील स्वतःची काळजी घेण्यास सांगत होते.
आम्हाला कोण जिल्हा परिषद अध्यक्ष ,हे आम्हा सामान्य गावगाड्यातील माणसानां माहीत नव्हते पण आज एखाद्या लहान मुलांला जरी विचारले कि जिल्हा परिषद चे अध्यक्ष कोण ? तर ते पण सांगतय आपल *संग्रामभाऊ* कारण आतापर्यंत गोरगरीब जनतेला न्याय देणारा कोण नव्हत ,पण आज भाऊच्या रुपात आज संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळाला आहे ,
आदरणीय भाऊ …… येणाऱ्या काळात तुम्ही पलूस कडेगाव चे जनतेचे नेतृत्व विधान भवनात करून गावगाड्यातील सर्वसामान्य जनतेला तुम्हीच न्याय देऊ शकता अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे….पुढील राजकीय वाटचालीस व तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडुन हार्दिक शुभेच्छा
श्री विकास माने – ढाणेवाडी