लोकनेते आ.संपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कडेगाव येथे जिल्हास्तरीय मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
लोकनेते आ.संपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कडेगाव येथे जिल्हास्तरीय मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन.
कडेगांव येथे ११ मार्च रोजी जिल्हास्तरीय मोफत महाआरोग्यशिबिराचे अयोजन.
कडेगांव : प्रतिनिधी.
टेंभू योजनेचे शिल्पकार, लोकनेते आमदार स्व. संपतराव आण्णा देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोमवार ११ मार्च रोजी मोफत जिल्हास्तरीय महाआरोग्य सेवा रोग निदान शिबिराचे आयोजन कडेगांव येथे स्व.सुरेशबाबा देशमुख चौक सांगली जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
या शिबिरामध्ये मोफत रक्त, लघवी, हिमोग्लोबिन, रक्तगट तपासणी, मोफत इ.सी.जी. गरोदर माता लसीकरण, पुरुष, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, डोळ्यांचे नंबर तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया मोफत कऱण्यात येणार असून या शिबिरात प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर, कृष्ण हॉस्पिटल कराड, टेके आय क्लिनिक सांगली, प्रगती हॉस्पिटल सांगली, भारती हॉस्पिटल तुरची, कमल हॉस्पिटल पलूस, पवार हॉस्पिटल पलूस, श्वास मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कडेगाव, पवार बाल रुग्णालय कडेगाव, ग्रामीण रुग्णालय कडेगाव या हॉस्पिटल मार्फत मोफत उपचार होणारं असून.
या शिबिरास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद कोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, कडेगांचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्षा नाजनीन पटेल प्रमुख उपस्थित असणार आहेत.
या जिल्हास्तरीय मोफत महाआरोग्यशिबिराचा कडेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याच्या आव्हान यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी केले.