कडेगांव नगरपंचायतीच्या सभापदी निवडी संपन्न. बांधकाम विजय गायकवाड,महिला व बालकल्याण मनीषा राजपूत, उपसभापती रंजना लोखंडे, आरोग्य शुभदा देशमुख, पाणीपुरवठा सभापती पदी नाजनीन पटेल यांची वर्णी.
कडेगांव नगरपंचायतीच्या सभापदी निवडी संपन्न.
बांधकाम विजय गायकवाड,महिला व बालकल्याण मनीषा राजपूत, उपसभापती रंजना लोखंडे, आरोग्य शुभदा देशमुख, पाणीपुरवठा सभापती पदी नाजनीन पटेल यांची वर्णी.
कडेगावं प्रतिनिधी :
कडेगाव नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा सभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या. कडेगाव नगरपंचायतीमध्ये सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष मा.आ.पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एकहाती सत्ता आहे, भाजपाचे ११ नगरसेवक तर काँग्रेसचे ५ व राष्ट्रवादीचा १ नगरसेवक आहे.
स्थायी समिती सभापती पदी नगराध्यक्ष धनंजय देशमुख, पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी विजय गायकवाड, महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा राजपूत, आरोग्य स्वच्छता सभापतीपदी शुभदा देशमुख, महिला व बालकल्याण उपसभापती पदी रंजना लोखंडे यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे पीठासीन अधिकारी कडेगाव पलूस चे प्रांताधिकारी रणजीत भोसले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन म्हेत्रे होते. या निवड प्रक्रियेवेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, बांधकाम सभापती विजय गायकवाड, अमोल डांगे, निलेश लंगडे, रंजना लोखंडे, शुभदा देशमुख, नाजनीन पटेल, दीपा चव्हाण,विद्या खाडे, नजमाबी पठाण, मनीषा राजपूत, अशपाक पठाण, विजय खाडे, सुनील गाडवे, संतोष डांगे, संदिप गायकवाड, हाजी.मुक्तार पटेल, युवराज राजपूत, बलजीत लोखंडे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.