ताज्या घडामोडी

कडेगाव तहसीलदार कार्यालयातील उपोषण, आंदोलन करण्याची जागा गायब? जागेसाठी मागावी लागणार ‘दाद’

कडेगाव तहसीलदार कार्यालयातील उपोषण, आंदोलन करण्याची जागा गायब? जागेसाठी मागावी लागणार ‘दाद’

Download Aadvaith Global APP

 

कडेगाव – प्रतिनिधी 

               शेतात जाण्यासाठी रस्ता,जमिनीचा कब्जा देणे असो वा वाटणी या सर्व कामांसाठी नागरीकांना तहसीलदार यांच्याकडे दाद मागावी लागते अशा शेकडो तक्रारी तहसीलदार यांच्याकडे असतात

ते याची शहानिशा करुन सर्वसामान्यांना न्याय देतात परंतु आता कडेगांव तहसीलदार अजित शेलार यांच्या कार्यालयातील महत्वाच्या जागेसाठी दाद मागावी लागणार आहे.उपोषण, आंदोलन करण्याची जागाच गायब झाली असल्याचे चित्र आहे.

                कडेगांव तालुका निर्माती होउन 23 वर्ष उलटली सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली अनन्या साठी तात्कालिक मंत्री स्व.डां पतंगरावजी कदम यांनी विशेष प्रयत्न करुन कडेगाव येथे तडसर रोडला भव्य दिव्य कार्यालय इमारत उभारली यात न्यायालय, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,भुमी अभिलेख,सहा.निबंधक, दुय्यम निबंधक,वन विभाग, कृषी विभाग,स्टेजरी आदी कार्यालय दिमाखात सुरू आहेत. याच कार्यालयात वाहनतळ, बगीचा, अभ्यागत कक्ष आहेत.

             परंतु या कार्यालयातून सर्वसामान्य नागरिकांना योग्य न्याय मिळत नसल्याने नाईलाजाने नागरीकांना उपोषण, आंदोलन करण्याची वेळ येते.आता पर्यंत कडेगांव तहसीलदार कार्यालयासमोर अनेक आंदोलने झाली परंतु ही सर्व आंदोलन उपोषण हि खाजगी मालकीची जागेवर झाली कार्यालयासमोर दोन महिन्यातुन एक वेळा तरी आंदोलन उपोषण ठरलेले असते. यासाठी मोठा मंडप उभारण्यात येतो जागाही खाजगी मालकाचीच मंडपाच्या मागे व्यवसाईक गाळे आहेत.या आंदोलन व उपोषणाचा परीणाम व्यवसायावर होत असल्याने येथील गाळा मालकांनी या जागेवर वृक्षारोपण केले आहे.आता सर्वसामान्य व राजकीय सामाजिक संघटनांना विविध आंदोलनासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी तहसीलदार अजित शेलार यांना तारेवरची कसरत करावी लानार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला झोपेतुन जागे करण्याची जबाबदारीही घ्यावी लागनार आहे.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App