कडेगांव शहरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत सिलेंडर गॅसचे वाटप

कडेगांव शहरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत सिलेंडर गॅसचे वाटप
कडेगाव प्रतिनिधी.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत कडेगांव शहरात वर्धमान गॅस एजन्सीसच्या वतीने मोफत गॅसचे वाटप भाजपाचे युवा नेते श्रीजय देशमुख यांच्या शुभहस्ते मोफत सिलेंडर गॅसचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना राजेश शहा म्हणाले कडेगांव शहरासह तालुक्यातील तालुक्यातील ग्रामीण भागातील सात ते आठ हजार गॅस धारकांना वर्धमान गॅस एजन्सीसच्या वतीने सेवा दिली जाते आज पर्यंत लोकांना आदर्श सेवा दिली आहे.ग्राहकांची सेवा हेच आमचा नफा आम्ही पाहतो.गॅस एजन्सी मधून जास्तीत जास्त समाजसेवा देण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी पत्रकार हेमंत व्यास, सभापती अमोल डांगे, सभापती निलेश लंगडे,मा.उपनगराध्यक्ष विजय गायकवाड ,विजय खाडे, दादासाहेब गायकवाड,व्यवस्थापक महेंद्र विभूते,स्नेहा वायदंडे,साक्षी चन्ने
, जालिंदर करकटे,राम रेणूशे, श्रीरंग मोरे यांच्या असंख्य उज्ज्वला धारक महिला उपस्थित होत्या.