मतदासंघातील एक ही रुग्ण उपचारापासून वंचित राहू देणार नाही. : संग्रामसिंह देशमुख, कडेगांव येथे मोफत जिल्हास्तरीय महाआरोग्य सेवा रोग निदान शिबिर संपन्न

मतदासंघातील एक ही रुग्ण उपचारापासून वंचित राहू देणार नाही. : संग्रामसिंह देशमुख कडेगांव येथे मोफत जिल्हास्तरीय महाआरोग्य सेवा रोग निदान शिबिर संपन्न. १७७६ लोकांनी घेतला शिबिराचा लाभ
कडेगांव: प्रतिनिधी
कोरोना काळामध्ये जे रुग्ण वाचले त्याला वाचवण्यासाठी आरोग्य खात्याचे लाखमोलचे योगदान आहे. आज केंद्र व राज्य सरकारच्या वतीने पाच लाखाच्या आतील सर्व उपचार मोफत होत आहेत. आज कडेगाव तालुका आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत खूप मागास आहे. मयत झालेल्या माणसाची बॉडी ठेवण्यासाठी कराड अथवा विटा या ठिकाणीं जावे लागते. पण काळजी करण्याचे कारण नसून कडेगाव नगरपंचायतीवर सत्तांतर झाल्यानंतर भाजपाचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे डीपीडीसी मधून मोठा निधी मिळाला असून त्यांचीही सोय आता होणार आहे. राजकारण हे क्षणभंगुर आहे. जे काही करता येईल ते आपल्या भागातील लोकांसाठी काम केले पाहिजे . लवकरच १५० बेडचे हॉस्पिटल आपण उभारणार असून मतदारसंघातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू देणार नसल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले.
कडेगांव या ठिकाणी लोकनेते आमदार स्व. संपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबीरामध्ये बोलत होते.
यावेळी विश्वतेज देशमुख,कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, प्रांताधिकारी रणजीत भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे, उपनगराध्यक्षा नाजनीन पटेल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, राजाराम गरुड, प्रमुख उपस्थितीत होतें.
यावेळी बोलतांना डॉ.विक्रमसिंह कदम म्हणाले जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भाऊंनी ज्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या नावे आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात केली. लोकांच्या आरोग्यासाठी खूप मोठी तळमळ संग्राम भाऊंना असल्यामुळे त्यांनी हे आरोग्य शिबिर भरवण्याचे खूप मोठे योगदान या क्षेत्रात दिले आहे. यावेळी प्रांताधिकारी रणजीत भोसले म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांनी एका छताखाली येऊन या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल हे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले. विशेष महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.व या आरोग्य शिबिरात महिलांची तुफान गर्दी दिसत असल्याने नक्कीच या आरोग्य शिबिराचा लाभ माता-भगिनींना होणार आहे. अपघाती निधन झालेल्या आशा सेविका सुषमा डोंगरे यांना आदरांजली वाहण्यात आली. तालुक्यातील ८५ क्षय रुग्णांना संग्रामसिंह देशमुख यांनी पुर्ण पणे बरे होईपर्यंत दत्तक घेतले. यावेळी स्वागत व प्रस्ताविक डॉ. अशा चौगुले यांनी केले तर आभार शांताराम कुंभार यांनी मानले. यावेळी अशोक साळुंखे, रोहित पाटील, विकास सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील,आबासो करांडे, हिंदुराव यादव, संग्राम यादव,सभापती शुभदा देशमुख, मनीषा रजपूत रंजना लोखंडे, दीपा चव्हाण, विद्या खाडे, संजीवनी डांगे, शंकर मोहिते, आशपाक पठाण, उदयकुमार देशमुख प्रकाश गडळे, महेंद्र पवार, उत्तम चव्हण, हनमंतराव कदम, बाबजी तात्या,विजय गायकवाड ,मंदाताई कारंडे,अमोल डांगे, विजय खाडे, आशपाक पठाण, विकास सूर्यवंशी, अर्चना घाडगे, संतोष डांगे, प्रकाश गायकवाड, संभाजी यादव, माणिक मोरे, नीलेश लंगडे,मूकतार पटेल, तानाजी जाधव, दादा गायकवाड, बाळुभैय शेख, भुजंग माळी, देवदास नांगरे, विलास धर्मे, बबन रासकर, संग्राम घार्गे, राजेंद्र दीक्षित संभाजी देसाई ,समीर इनामदार, किशोर मिसाळ, दत्तात्रय क्षीरसागर, विद्या पवार यांच्या सह आरोग्य विभिगाचा स्टाप तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.