ताज्या घडामोडी

संग्राम भाऊ देशमुख यांनी लाडू वाटप करून नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याचा आनंदोत्सव केला साजरा.

संग्राम भाऊ देशमुख यांनी लाडू वाटप करून
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याचा आनंदोत्सव केला साजरा.

कडेपूर येथे शपथविधी सोहळा लाईव्ह प्रक्षेपणचे उत्कृष्ट नियोजन.

कडेपूर : प्रतिनिधी.

भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा व अन्य भाजपा व मित्रपक्षांच्या ३५ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन दिल्ली या ठिकाणी पार पडला. या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण कडेपूर येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या वतीने राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी मोठ्या स्क्रीन वर भाजप कार्यकर्त्यांसोबत शपथविधी सोहळा पाहण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी शपथविधी सोहळ्याची हॅट्रिक सुरू होताच फटाके फोडून व विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना लाडू भरवून आनंदोस्तव साजरा करन्यात आला.

यावेळी कडेगांवचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, भाजपाचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित.

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App