टेंभू लाभक्षेत्रापासून वंचित असणार्या भागाला मिळणार पाणी :संग्रामसिंह देशमुख यांची ग्रामस्थच्या उपस्थितीत टेंभू अधिकारीशी चर्चा
टेंभू लाभक्षेत्रापासून वंचित असणार्या भागाला मिळणार पाणी :संग्रामसिंह देशमुख यांची ग्रामस्थच्या उपस्थितीत टेंभू अधिकारीशी चर्चा.
कडेगांव प्रतिनिधी.
कडेगांव तालुक्यातील टेंभू योजनेचे पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रेडडीआर यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख (भाऊ) यांनी विविध गावांतील विविध विषयांवरील चर्चा करून बरेच प्रश्न मार्गी लावले.
कराड येथील ओगलेवाडी येथे जलसंपदा विभागातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार यांच्याशी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी कडेगांव तालुक्यातील आणखी काही गावांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये कडेगाव तालुक्यातील उपाळे मायणी, उपाळे वांगी, ढाणेवाडी, खेराडे वांगी, तोंडोली, सासपडे या गावांचा समावेश आहे. कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी सदर भागाचे सर्वेक्षण करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करणार असल्याचे आश्वासन दिले.
तसेच टेंभू योजनेच्या माध्यमातून अपशिंगे, कोतावडे, रायगांव, शाळगाव, शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव दि. 3 जून 2024 रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली.
या वेळी जि. प. माजी उपाध्यक्ष दत्तू शेठ, अण्णा सूर्यवंशी, जयसिंगकाका घार्गे, शिवाजीदादा ढाणे, कडेगाव पंचायत समिती माजी उपसभापती आशिष घार्गे, माजी सरपंच डॉ. सतीश जाधव,माजी सरपंच संजय आबा माने, सर्जेराव मोहिते,विकास माने,हणमंत ढाणे, बाळासाहेब नलवडे, बबन ढाणे, शशिकांत तोडकर, शशिकांत घार्गे यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.