घरात वाहन, तरीही रेशनिंगवर डल्ला मारणे पडणार महागात थेट गुन्हा दाखल होणार
घरात वाहन, तरीही रेशनिंगवर डल्ला मारणे पडणार महागात थेट गुन्हा दाखल होणार
कडेगाव : प्रतिनिधी
कडेगांव तालुक्यामध्ये सदयस्थितीत धनदांडगे लोक घरात वाहन आहे गरज नसताना व त्यांची बाहेरुन खरेदी करण्याची ऐपत असतानाही रेशनचे धान्य उचलत आहेत. धान्यावरील हक्क सोडण्यासाठी बडी मंडळी स्वतःहून पुढे आली नाहीत, तर पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे व चुकीची माहिती सादर करुन स्वस्त धान्य मिळविण्याच्या उद्देशाने शिधापत्रिका मिळविल्याबद्दल थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी दिले आहेत.
तहसीलदार डॉ शैलजा पाटील म्हणाल्या
अन्नसुरक्षा योजनेमधील लाभ घेणा-या लाभार्थ्याचे कुटूंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर वकील, कुटूंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर, 4 चाकी यात्रिक वाहन आहे, ज्यांचे बंगला आहे, ज्यांचे कुटूंबात पेन्शनर, नोकरदार व्यक्ती आहेत, व आयकर भरणारे तसेच उच्च उत्पन्न गट यांनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती द्यावी व धान्यावरील हक्क सोडावा अन्यथा तपासणीत आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. अनेक धनदांडगे लोक गरज नसताना व त्यांची बाहेरुन खरेदी करण्याची ऐपत असतानाही रेशनचे धान्य उचलत आहेत. धान्यावरील हक्क सोडण्यासाठी बडी मंडळी स्वतःहून पुढे आली नाहीत, तर पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय चुकीची माहिती सादर करुन स्वस्त धान्य मिळविण्याच्या उद्देशाने शिधापत्रिका मिळविल्याबद्दल थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही अशा लोकांची माहिती पुरवठा विभागाकडे द्यावी, त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. हक्क सोडण्याचे अजं रास्त भाव दुकानदार यांच्याकडे उपलब्ध राहतील, तसेच यातून निर्माण होणारा इष्टांक तात्काळ गरीब व गरजू नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल, असे तहसिलदार यांनी सांगितले आहे.
कडेगांव तालुक्यातील अन्नसुरक्षा योजनेतील सधन लाभार्थीनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होवून गरीब व गरजू लोकांना अन्नसुरक्षा याजनेचा लाभ मिळवन देणेस हातभार लावून समाजहित, देशहित, व राज्यहित जपून देशास वा राज्यास बळकट करणेच्या प्रक्रियेचा एक भाग व्हावे असे आवाहन तहसिलदार डॉ. पाटील यांनी केले आहे.