ताज्या घडामोडी

टेंभू च्या पाण्यासाठी आर या पार लढाई : डी. एस.देशमुख

टेंभू च्या पाण्यासाठी आर या पार लढाई : डी एस देशमुख

कडेगांव : प्रतिनिधी.

टेंभू योजनेचे पाणी कडेगाव सह अन्य आसपासच्या गावात पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी आर या पारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन पाणी संघर्ष समिती तर्फे प्रांताधिकारी,टेंभू ऑफिस, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक कडेगाव यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कडेगाव तालुक्यातून पुढे चार तालुके, दोन जिल्हेपार करून सांगोला आटपाडी जत या ठिकाणी गेले मात्र कडेगाव शहरातील पूर्व, दक्षिण भाग, नेर्ली, अपशींगे,कोतावडे, शाळगांवचा काही भाग टेंभूच्या पाण्यापासून नेहमी वंचित राहत आहे. कडेगांव शहरात प्रांत,तहसील, नगरपंचायत,पंचायतसमिती, कन्या महाविद्यालय, कृषी विद्यालय, औद्योगिक विद्यालय, सूतगिरण्या, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात असल्याने शहराची लोकसंख्या जवळपास २५ हजाराच्या आसपास असून अन्य गावांची मिळून ७० हजार लोकसंख्या आहे, कडेगांव शहराला कडेगांव तलावतून पाणीपुरवठा होतो पण या तलावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी असल्यामुळे तलाव ही कोरडा पडला आहे, सध्या सर्वत्र उन्हाचा तडाका वाढला असून शिवाजीनगर,निमसोड कॅनॉलला धो-धो पाणी वाहत असताना कडेगाव गोविंदगिरी कॅनॉल ला एक ही आवर्तन सोडले गेले नाही परिणामी शहरातील सर्व कुपनलिका पाणीपुरवठा विहिरींनी तळघटल्यामुळे शहरातील जनतेला पाणी विकत घ्यावे लागत आहे, अत्यंत बिकट अवस्था पाण्यासाठी झाल्याची दिसून येत आहे.

पाणी पुरेसे मिळावे यासाठी नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, शाळगाव ग्रामपंचायतीनी शासनास पत्र सादर केली आहेत व पाण्यासाठी पाणी संघर्ष समितीला पाठिंबा दिला आहे.त्यामुळेच शहर व आसपासच्या गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईने पाणी पुरवठा करणे, सूर्ली व कामती आवर्तन एकाच वेळी सुरू राहणे, पाणी उपसा करणारे पंप बदलून जास्त हॉर्स पावरचे बसविणे,टेंभू अभियंता रेड्डीयार यांची भ्रष्ट कामाची चौकशी लावणे या मागण्यासाठी आर या पार चे आंदोलन करण्यात येणार आहे, मागण्या मान्य न झाल्यास ११ जूनला प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा, २५ व २६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन तरीदेखील शासन व प्रशासनाने दखल घेतली नाही तर २७ जूनपासून त्याच ठिकाणी पाणी संघर्ष समितीचे संस्थापक डी.एस देशमुख आमरण उपोषणाला बसणार असून अन्य नागरिकानचे साखळी उपोषण होणार आहे.

यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख,संयोजक अभिमन्यू वरूडे, प्रकाश गायकवाड, संजय तडसरे, रघुनाथ गायकवाड, संदिप देसाई,
मोहन माळी, नगरसेवक दादा माळी, दादा रासकर, दत्ता माळी, महेश शिंदे, युनूस इनामदार, प्रकाश शिंदे, राजेंद्र थोरात (निर्मळ), जीवन करकटे, सतीश गरुड, बजरंग अडसूळ, नामदेव रासकर आदि उपस्थित होते.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App