कडेगाव तालुक्यात ‘महसूल पंधरवडा’ निमित्ताने दाखल्या बरोबर छत्री….
कडेगाव तालुक्यात ‘महसूल पंधरवडा’
निमित्ताने दाखल्या बरोबर छत्री….
कडेगाव: प्रतिनिधी
लाडक्या बहिणीला दाखल्या सोबत छत्री….
सध्या पावसाचे दिवस आहेत विविध दाखले
काढण्यासाठी ग्रामीण भागातुन महिला पुरुष येत आहेत लाडकी बहिण योजनेसाठी आलेल्या महिलांना यावेळी दाखले वितरित करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयाकडुन दाखल्या सोबत छत्री ही भेट म्हणून देण्यात आली यावेळी लाडक्या बहिणीला हप्ता आधीच छत्रीची भेट मिळाली असल्याची चर्चा होती.
कडेगाव तालुक्यातील महसूल विभागाचा ‘महसूल पंधरवडा’ १ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येत आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
गुरुवारी दिनांक १ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार,नायब तहसीलदार माहेश अनारसे ,वैष्णवी पुजारी ,सागर कुलकर्णी यांचेसह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत “महसुल दिन” साजरा करण्यात आला व महसूल सप्ताह प्रारंभ करण्यात आला ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना कार्यक्रमाचे स्वरूप, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्र वितरित करण्यात आली तसेच कार्यालय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयात विवीध योजनेचे फलक व रांगोळी काढण्यात आली, विविध दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रांच्या माहिती पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक युवकांना लाभ देण्यासाठी विविध दाखल्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले .यावेळी रक्तदान शिबिरही संपन्न झाले.यापुढे १५ ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले
.