पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 85 हजार 157 मतदार,प्रारूप मतदार यादी प्रसिध्द :प्रांताधिकारी रणजीत भोसले
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 85 हजार 157 मतदार,प्रारूप मतदार यादी प्रसिध्द :प्रांताधिकारी रणजीत भोसले
कडेगाव : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.पलूस-कडेगाव – पुरूष-1 लाख 43 हजार 264, स्त्री – 1 लाख 41 हजार 885, तृतीयपंथी – 8, एकूण 2 लाख 85 हजार 157 आहेत .प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मतदार यादीत आपले नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी असे आवाहन कडेगाव प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.
कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेस कडेगाव तहसीलदार अजित शेलार उपस्थित होते.
प्रांताधिकारी रणजीत भोसले म्हणाले की
प्रारूप मतदार यादी पलुस कडेगांव तहसिल कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रारूप मतदार यादीबाबत दावे व हरकती असल्यास 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदवाव्यात. मतदार यादीत नाव नसेल तर मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करावा. प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे इत्यादीकरीता नमुना 8 मध्ये अर्ज करता येईल. ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन मतदार स्वत: नोंदणी , वगळणी , स्थलांतरण , दुरुस्ती इत्यादी करु शकतात.
पलुस कडेगांव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये मतदान केंद्रांच्या नावात बदल,ठिकाणात बदल, विलिनीकरण व नविन मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत .