ताज्या घडामोडी

तहसिलदार अजित शेलार यांच्या अथक परिश्रमाने नोंदीचे काम पुर्ण कडेगांव तालुक्यात ६४३५कुणबी नोंदी तालुक्यातील ४५ गावात कुणबी

तहसिलदार अजित शेलार यांच्या अथक परिश्रमाने नोंदीचे काम पुर्ण कडेगांव तालुक्यात ६४३५कुणबी नोंदी
तालुक्यातील ४५ गावात कुणबी

कडेगांव :प्रतिनिधी

कडेगाव तालुक्यातील ४५ गावातील १८६५ते १९१०मधील मोडी लिपीतील असलेल्या संपूर्ण दप्तर तपासणीतून ६४३५ नोंदी सापडल्या आहेत. वांगी गावात सर्वाधिक ७३८ नोंदी सापडल्या असून नेवरी येथे सर्वाधिक कमी म्हणजे १०नोंदी सापडल्या आहेत . तर शिरगाव व कोतीज या गावात कोणाचीही कुणबी असल्याची नोंद आढळून आली नाही.

कुणबी नोंदीच्या गांवनिहाय पुढीलप्रमाणे वांगी ७३८,सोनकिरे३६१,कोतवडे३४५,शिरसगांव३२२,निमसोड ३१३, शेळकबाव२४२, अमरापूर २३६,आसद२२५,चिखली२२०,
शिवाजीनगर२०८,सोनसळ२०४,नेर्ली२०३,खंबाळे औंध१९४,येडे१८३,चिंचणी१७७, अपशिंगे१६९, कुंभारगांव१४७, शाळगांव१४६, विहापूर१४६,तडसर१४४,भिकवडीखुर्द१४३,हिंगणगांव बुद्रुक१२८, हणमंतवडिये११९पाडळी११२, खेराडे विटा१०१,तोंडोली ८६,शिवणी८१, उपाळेवांगी७९ उपाळेमायणी६८,कान्हरवाडी६३, अंबक६०,सोहोली ५९, हिंगणगांव खुर्द५७, खेराडे वांगी५५, वडीयेरायबाग५०, रायगांव४३,येतगांव२३,मोहिते वडगाव२१,कडेगाव१९,रामापूर१९,कडेपूर१३,नेवरी१० शिरगांव व कोतिज निरंक अशा नोंदी सापडल्या आहेत.कडेगाव तालुक्यातील एकूण ५५गांवाच्यापैकी४५गांवच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत.गेली सात महिन्या पासुन कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.तहसिलदार अजित शेलार यांच्या अथक परिश्रमाने नोंदीचे काम पुर्ण झाले आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार शेलार यांचे अभिनंदन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App