मराठा जातीचे महाराष्ट्रातील पहिले 30 स्वतंत्र प्रमाणपत्र कडेगाव तालुक्यातुन वितरीत
प्रांताधिकारी रणजीत भोसले
मराठा जातीचे महाराष्ट्रातील पहिले 30 स्वतंत्र प्रमाणपत्र कडेगाव तालुक्यातुन वितरीत
कडेगांव :प्रतिनिधी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा जातीचे एस.इ.बी.सी. राज्यातील पहिले 30 दाखले कडेगाव तालुक्यातुन वितरीत करण्यात आले आहेत मराठा जातीचे स्वतंत्र प्रमाणपत्र प्रांताधिकारी रणजीत भोसले यांच्या हस्ते अर्जदारांना वितरीत करण्यात आले.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ रोजी विशेष अधिवेशनात घेतलेल्या निर्णयांत मराठा जातीचे व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र एकत्रित देण्यात येत होते .परंतु 28 जुन 2024 च्या सुधारीत आदेशानुसार आता मराठा जातीचे व नॉन क्रिमिलेअर असे स्वतंत्र दोन प्रमाणपत्र देण्यात येत आहेत 28 जुनच्या आदेशानुसार मराठा जातीचे प्रमाणपत्र देणे बाबत महाऑनलाईन पोर्टलवर नुकतीच दुरुस्ती करण्यात आली तांत्रिक अडचणीचा सामना करत कडेगाव सेतू केंद्रातून दाखले भरून ते 24 तासात मंजूर करण्यात आले व अर्जदारांना वितरित करण्यात आले आहेत. सध्या शैक्षणिक प्रवेश व विविध विभागातील नोकर भरतीचा विचार करून दाखले तात्काळ देण्याबाबतच्या सूचना प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार महाराष्ट्रातील पहिले मराठा जातीचे 30 प्रमाणपत्र कडेगाव तालुक्यातील वितरित झाले आहेत याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे
.