टेंभू चे पाणी, कडेगांव तलावात थेट सोडा :नगराध्यक्ष धनंजय देशमुख

टेंभू चे पाणी, कडेगांव तलावात थेट सोडा :नगराध्यक्ष धनंजय देशमुख.
टेंभू कार्यकारी अभियंता रेड्डी आर यांच्याकडे मागणी
कडेगांव प्रतिनिधी.
कडेगांव शहरास सध्या कडेगांव तलावातील विहिरीतून पाणी पुरवठा होत आहे.मात्र कडेगांव लघू पाटबंधारे विभागाच्या कडेगांव तलावाची पाणी पातळी फारच खालावली आली.सध्या कडेगांव तलावातील सोडण्यात येणारे पाणी फार फिरून येत आहे यामुळे या पाण्याला मोठ्या प्रमाणात गळती आहे यामुळे पाणी फार कमी पोहचते तर नेली मायनर 11 मधून कडेगांव तलावात थेट पाईपने पाणी सोडावे अशी मागणी कडेगांव नगरपंचायत नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांनी टेंभू उपसा कार्यकारी अभियंता रेड्डी आर यांना केली आहे.
वाढत्या दुष्काळाची तीव्रता पाहता कडेगांव तलावातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमीच होत आहे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी कडेगांव तलावाचा वापर होत असतो.यावषी कडेगांव तालुक्यातील कडेगांव तलाव पुर्णपणे भरला नाही.केवळ एकच मोठा पाऊस झाला यामुळे कडेगांव तालुक्यातील पाणी पातळी खुपच खालावली आहे.कडेगाव शहरातील २५००० लोकसंख्या असलेल्या लोकांना या तलावातून पाणी पुरवठा होत आहे.कडेगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची तहान कडेगांव तलावच मोठ्या प्रमाणात भागवू शकतो यामुळे कडेगांव तलावात टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे नेली मायनर ११ मधून पाणी द्यावे अशी मागणी नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता रेड्डी आर साहेब यांच्या कडे केली आहे. याबाबतीत अभियंता बी.आर पाटील पाहणी करुन या नवीन पध्दतीने जर टेंभू योजनेचे पाणी कडेगांव तलावात सोडले तर गळती राहणार पाणी मोठ्या प्रमाणात कडेगांव तलावात दुप्पटीने जमा होणार आहे.कोणत्याशी शेतकरी यांच्या कडून पाणी उपसा मध्येच होणार नाही.नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांची कल्पना टेंभू उपसा जलसिंचन योजनाचे अधिकारी यांना ततत्वा पटली असून पाहणी करून भविष्यात कायमस्वरूपी याच ठिकाणाहून कडेगांव तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या सभापती अमोल डांगे, सभापती निलेश लंगडे, विजयसिंह खाडे, युवराज राजपूत,अशपाक पठाण,प्रकाश शिंदे आण्णा व मान्यवर उपस्थित होते.