ताज्या घडामोडी

पृथ्वीराज देशमुख यांचा २६ वर्षांचा “वनवास” भाजपा संपवनार का ?दुष्काळी फोरमचा वजीर आज “राजकीय” पटलावर

पृथ्वीराज देशमुख यांचा २६ वर्षांचा “वनवास” भाजपा संपवनार का ?दुष्काळी फोरमचा वजीर आज “राजकीय” पटलावर

Download Aadvaith Global APP

 

कडेगाव/ मुख्य संपादक 

         माजी आमदार स्व. संपतराव आण्णा देशमुख यांचा वारसा सोबत असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांची राजकीय वाटचाल आजवर संघर्षातून उभा राहिलेली आहे.सांगली जिल्ह्यातील दुष्काळी फोरमचा वजीर आज राजकीय पटलावर आहेत.पृथ्वीराज देशमुख यांचा २६ वर्षचा वनवास भाजपा खासदारकीची माळ गळ्यात घालून संपवणार का ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

सांगली जिल्ह्यातील एकीकाळी दुष्काळी फोरम म्हणून एक टीम होती त्या टीम मधील सर्वात तरूण चतुर व्यक्तीमत्व हे पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे पाहिले जात होते.२०१४ साली राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली सांगली जिल्ह्यातील दुष्काळी फोरम राष्ट्रवादी सोडून देवेंद्र फडणवीस व स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये दाखल झाली.

             यामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकत वाढली तसेच देशभरात मोदींचा वाढता करिश्मा यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक,सहकार क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रातील भाजपा वरचढ ठरली त्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद पृथ्वीराज देशमुख यांनी गेली सहा वर्षे उत्कृष्ट पने सांभाळले होते.

              जिल्ह्यातील काँग्रेस – राष्ट्रवादीच्या अंतर्गत सेटलमेंट मुळे त्यांनी २६ वर्षाचा राजकीय वनवास देशमुख कुटुंबीयांनी सोसला आहे.

               माजी आमदार संपतराव देशमुख यांचा वारसा सोबत असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांची राजकीय वाटचाल आजवर संघर्षातून उभा राहिलेली आहे.1996 सालच्या पोटनिवडणूकीत पतंगराव कदम यांच्यासारख्या त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ,असलेल्या नेत्यांचा पराभव करत ते विधिमंडळ सभागृहात पोहोचले.त्यावेळी शिवसेना भाजपाचे सरकार होते.

संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेली ही पोटनिवडणूक राज्यात लक्षवेधी झाली होती तेव्हा देशमुख विजयी झाले आणि राज्यभर त्यांचे नाव गेले. याकाळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जवळचे आमदार अशी देशमुख यांची ओळख होती. तसेच जोशी यांचे सुपुत्र उन्मेष यांच्यासोबत त्यांची मैत्री होती. सरकार युतीचे पण मॅजिक फिगर काटावर. त्यामुळे देशमुख यांच्यासारख्या काँग्रेस बंडखोर आमदारांना नेहमीच झुकते माप दिले जात होते. याचा फायदा उठवत देशमुख यांनी मतदारसंघातील विकासकामे आणि पाणीयोजनाना निधी आणला.

 

1999 साली काँग्रेस पक्षातील फुटीनंतर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. यावेळी झालेल्या निवडणुकीत पतंगराव कदम यांच्याकडून ते पराभूत झाले. नंतर 2004 विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता 2009,2014 या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांना अपयश आले..

2014 च्या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीधर्म न पाळता सांगली जिल्ह्यातील त्यांच्यासारखे समदुःखी असलेल्या संजय पाटील यांना मदत केली आणि 1999 पासून सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी केलेल्या अन्यायाचा वचपा काढला, त्यानंतर राष्ट्रवादीत असतानाचं ते पाचव्यामैलावर नितीन गडकरी यांचा सत्कार करायला गेले आणि पुढची दिशा स्पष्ट करत भाजपमध्ये गेले..

 

 

२०१४ नंतर भाजपवासी झालेल्या देशमुख यांनी पक्ष नियमानुसार ‘संघ’ घटनात्मक काम करीत जिल्हाभर परेड करीत पक्ष वाढविण्यास मदत केली. विद्यमान खासदारांशी संघर्ष असताना सुद्धा पहिली फळी एकसंघ ठेवत शहरी, ग्रामीण आमदार यांच्याशी समझोता करीत पक्षाचे काम निष्ठेने चालू ठेवले होते.

२०१८ साली स्व. डॉ.पतंगरावजी कदम यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत विद्यमान आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या विरोधात आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केलं व आजपर्यंत तसे वागले सुध्दा आहेत देशमुख जे बोलतात तेच करतात मागे एक व पुढे एक कधीच करीत नाहीत.

  स्व. पतंगरावजी यांच्याबरोबर विचाराची लढाई होती की आता संपली असे जाहीर करीत डॉ. विश्वजीत कदम यांच्या बरोबर कधीही लढणार नसल्याचे जाहीर करीत राजकीय संन्यास जाहिर करीत आपले बंधू संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी राजकीय वाट मोकळी करून दिली होती.

              आपला जनसंपर्क ,राम मंदिर आणि मोदीची लाट यावर स्वार होण्यासाठी देशमुख लोकसभेसाठी रणांगणात उतरले आहेत.तब्बल तीस वर्षाचा संघर्ष करणाऱ्या देशमुख कुटुंबियांनी आपली ऐंशी ते नव्वद हजाराची कार्यकर्त्यांची सेना टिकवण्यात यश मिळवला आहे. त्या बळावरच ते आता लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत घेण्याच्या तयारीत आहेत.

 कडेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी देशमुख यांना भविष्यात मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले होते.फडणवीस आणि देशमुख यांची जवळचे संबंध असल्याने उमेदवारीच्या आशा पल्लवित आहेत. भाजपने त्यांना जिल्हा अध्यक्ष बंन्धु संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देउन , पृथ्वीराज देशमुख यांना एका वर्षा साठी विधान परिषदेचे आमदार,पदी संधी देत पुणे पदवीधर संघात संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली होती.आता.सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केलेले विशाल पाटील यांनी जिल्ह्याभर दौरे करत असताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळणार असा दावा केला आहे. 

2014 नंतर दरम्यानच्या काळात त्यांना काही महिने मुदतीची विधानपरिषदेवर संधी मिळाली. पण त्यांना 2014 नंतर कोणतीही निवडणूक लढवता आलेली नाही,आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे.भाजपामधील वरिष्ठाच्या सूचनेनुसार त्यांच्या हालचाली सुरु आहेत असेही सांगितले जात आहे.

 

सांगलीत लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खासदार संजय पाटील यांनी आपली उमेदवारी घोषित केलीय. त्याचवेळी देशमुख यांनीही आपल्याला उमेदवारी फायनल आहे असे सांगत दौरे सुरु केले आहेत.

संजय पाटील यांच्यासमोर पृथ्वीराज देशमुख यांच्या रूपाने प्रबळ दावेदार समोर आल्याने भाजपासमोर सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.2014 नंतर अनेक गोष्टीवरून पाटील देशमुख यांच्यात वाजले आहे, त्याचे पडसाद अधूनमधून उमटत असतात त्याचवेळी भाजपाची उमेदवारी हा आगामी काही दिवसात कळीचा मुद्दा होणार आहे..

सांगलीत पलूस कडेगाव, जत, तासगाव कवठेमंहकाळला महाविकास आघाडीचे आमदार आहेत तर खानापूर, सांगली मिरज येथे महायुतीचे आमदार आहेत. काँग्रेस आणि भाजपा दोन्हीही बाजूने समानचित्र आहे, मात्र काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे, त्याचवेळी पृथ्वीराज देशमुख यांनी मुंबई दिल्लीला जाऊन उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याने रंगत आलीय..

लोकांना सहज उपलब्ध होणे, लोकांच्या साध्या साध्या कामासाठी फोन करणे, मोठा जनसंपर्क, विरोधकांशी सुद्धा टोकाचा संघर्ष न करता व्यक्तिगत संबंध जपणे, भाजपामधील वरिष्ठ नेत्यांच्यासोबतचा जिव्हाळा, अटीतटीच्या निवडणुकीचे अनुभव, भाजपासोबत राष्ट्रवादी नेत्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ही त्यांची बलस्थाने आहेत.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App