महाराष्ट्रराजकीय

सर्वसामान्य जनतेला पाठबळ देणारे नेतृत्व: मा.संग्रामसिंह देशमुख भाऊ…

सर्वसामान्य जनतेला पाठबळ देणारे नेतृत्व:

Download Aadvaith Global APP

मा.संग्रामसिंह देशमुख भाऊ…

 

परवा 16 मे ला स्व. संपतराव आण्णांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे जे स्मारक हाेत आहे तिथे गेलाे हाेताे. जायचे आणि पुष्पहार अर्पण करून यायचे असा जाताना विचार करून निघालाे. गेल्यानंतर अख्खा दिवस तिथे कसा गेला कळलेच नाही. एका बाजूस आण्णांच्या अस्तित्वाच्या खुणा आणि नजरेसमाेर संथ वाहणारे टेंभूचे पाणी हे अलाैकीक दृष्य माझ्यासमाेरून हटतच न्हवते… एक प्रश्न मात्र मनाला अस्वस्थ करत हाेता आज वकील आण्णा असते तर ?.. मन गलबलून जात हाेते, कुसळं पण उगवत न्हवती त्या आमच्या फोंडया माळावर आम्ही आज लाखाे रुपये मिळवत आहाेताे. ही किमया घडवणारा किमयागार स्व. संपतराव देशमुख आज हयात हवे होते. या विचाराने थोडेसे भावनाविवश झालो.आजूबाजूस पाहीले ,आपणास काेणी बघत नाहीत याची खात्री हाेताच खिशातील रूमाल काढला…डाेळयातील आसवं टिपली.. त्याच वेळी काेपऱ्यात उभा राहून एका माणसाकडं टक लावून पाहू लागलाे… आण्णांचा मुलगा आमच्यासारख्या आण्णांच्या शिलेदारांची आस्थेने चाैकशी करत हाेता. का कुणास ठावूक संग्राम देशमुखांना पाहीले आणि पुन्हा आण्णांचा आभास हाेवू लागला… हा आभास नाही तर खात्री बाळग अस मन समजावत हाेतं… स्व. संपतराव देशमुख गेले नाहीत तर ते संग्रामभाऊंच्या रूपाने आपल्या बराेबरच आहेत हे चित्र उभे राहीले. आण्णा गेले खरे पण हजाराे लाेकांच्या आयुष्यात नंदनवन खुलवून गेले. वैभवाचे दिवस आज बघण्यासाठी ते नाहीत. त्यांनी आमच्या शेतीला पाणी दिले पण आण्णांना
त्यांचे उत्तरदायीत्व ते असताना आपण देवू शकलाे नाही याची खंत मनात आजही आहे. त्याच वेळी कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आली आहे अशी भावना निर्माण झाली. तीच भावना मनी धरून संग्रामभाऊंना भेटलाे… निघताे असे सांगताच त्यांनी हातात हात घेतला… तब्बेत बरी आहे का ? …जेवण केले का? असे विचारले आणि पुन्हा स्व. आण्णाचा स्पर्ष जाणवला. ज्या माणसांने आम्हाला पाणी देवून आमच्या आयुष्याचे साेनं केलं त्यांच्या मुलाला वाढदिसानिमित्त शुभेच्छा देताना आण्णा आज पहायला नाहीत पण संग्रामभाऊंच्या पाठीशी उभे राहणे हे नैतिक कर्तव्य मी मानतो.
संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाबद्यल मी अलिकडच्या काळात खुप गांभीर्याने विचार करू लागलाे आहे. शेवटी राजकारणात सर्व कसाेटयावर नेतृत्व घडावे लागते. वडीलांच्या माघारी केवळ त्यांनी मागे ठेवलेली गाडी चालवून भागत नाही तर वडीलांच्या विचारांचा, कृतीचा वारसा देखिल तितकाच सक्षमपणे चालविला पाहीजे. निवडणूकीतील जिंकणे, पराभव हाेणे यावर कधी स्व. आण्णांनी त्यांच्या राजकीय यशाची गणिते बांधली नाहीत. ते अखेरपर्यंत लढले, गरींबांची ते ढाल बनले हाेते, आयुष्याच्या लढाईत ते हरले असतील पण सामान्यांच्या ह्दयावर आजही ते अजिंक्य आहेत. माेठया शक्तीचा पराभव करूनही त्यांनी कधी सत्तेचा गर्व अंगी येवू दिला नाही. साध्या राज्यमंत्रीपदासाठी काेटीच्या काेटी निधी हायकमांडला देणारे आजचे राजकारणी आपण पाहताे आहाेत. समाेर लढाई नसतानाही केवळ मताधिक्य वाढावे म्हणुन मतांसाठी पैसे वाटणारेही असंस्कृत राजकारणीही जनतेने पाहीले. पण कॅबीनेट मंत्रीपदाला ठाेकर देवून माझ्या शेतकऱ्यांना पाणी दया असे सांगणाऱ्या स्व. संपतरावआण्णांच्या स्मृती जागविताना ज्या ठिकाणी टेंभूची कुदळ मारली त्याचठिकाणी संग्रामभाऊंनी आण्णांचे स्मारक उभारले ही त्यांची वैचारीक कृती माझ्या मनाला भावली आहे. जे जे नेते दिवंगत झाले त्या प्रत्येक नेत्याच्या वारसाला संधी मिळाली. मग ज्या माणसाने अखेरपर्यंत जनतेसाठी जीवाची पर्वा केली नाही त्या स्व. आण्णांच्या मुलावर अन्याय का? हा प्रश्नही या निमित्ताने माझ्या मनात तयार झाला.
संग्रामभाऊ किती माेठे झाले हे माझ्या दृष्टीने खुप नाही तर ते आमच्याशी वागतात कसे यावर आम्ही त्यांचे मुल्यमापन करताे. आजकालची तरूण नेते मंडळी ही नेते या त्यांच्या चाैकटीतून बाहेर येत नाहीत. आजूबाजूस सुरक्षा रक्षकांचा गराडा, व्हाईट काॅलर लाेकांत उठबस असे असताना आपला माेठा भाऊ वाटणारा आपल्या सुख दुखात समरस हाेणारा असे एखादेच संग्रामभाऊ जेव्हा भेटतात तेव्हा संग्रामभाऊच का? या प्रश्नाचेही उत्तर मिळते. जिल्हा परिषदेचा त्यांचा यशस्वी कारभार आम्ही जवळुन अनुभवला आहे.अर्थात हा वारसा रक्तातूनच आला आहे. कडेगाव विटा एसटीतून आण्णा लाेकांना घेवून विटयाला जायचे. त्याकाळी सर्व कार्यालये विटयात असायची. काेर्टाच्या समाेरील झाडाखाली लाेकांच्यात बसून कांदेभजी खायचे. दिवस नाही, रात्र नाही कायम लाेकांसाठी आण्णा राबायचे. या देशमुख कुटूंबाने त्यांचा एक माणूस आपल्यासाठी गमावला आहे. याचे काही तरी आपण देणं लागताे ही भावना मला आजही अस्वस्थ करणारी आहे. संग्रामभाऊ आण्णांची प्रतिकृती आहे. स्वकीयांशी तर जिव्हाळयाचे नाते आहेच त्याचबराेबर विराेधकांशी कसलाही आकस न ठेवणारा हा तरूण आज जेव्हा भरारी घेताे आहे, तेव्हा त्यांना पाठबळ देणे हीच आण्णांच्या प्रति कृतज्ञता हाेवू शकते. आण्णांची टेंभूबाबतची जी तडफ मी पाहिली, तीच जिद्द आणि चिकाटी संग्रामभाऊंनी नेवरी वितरिकेच्या बाबतीत दाखविली. आज जनतेला गृहीत धरून, मतदारांना विकावू समजून जे राजकारण सुरू आहे अशा वेळी संग्राम देशमुख नावाच्या हाकेला धावणाऱ्या आणि सतत आपल्यासाेबत राहणाऱ्या नेत्याला साथ करणे आपले कर्तव्य आहे. स्व. आण्णांनी वाळवंटात एखादे हिरवे राेपटे उगवावे असे काम केले. माझी माणसं स्वतःच्या पायावर उभ राहावती असे स्वप्न बघीतले. बेधुंद हाेवून सर्व अमिषे लाथाडून आण्णांनी आपणाला पाणी दिले. म्हणूनच जाती धर्माच्या पलीकडला शेतकरी आज दिमाखात उभा आहे.आपली तहान भागवणाऱ्या माणसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची जबाबदारी निर्माण झाली आहे. संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी राहण्याची हीच ती वेळ आली आहे…

लेख:श्रीनिवास आनंतराव कराडकर.
कडेगांव.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App