करिश्मा मुलाणी यांचा बॅंक सखी पुरस्कार देऊन गौरव : सलग तीसऱ्यांदा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार : कोल्हापूर येथील कार्यक्रमात गौरव

.
करिश्मा मुलाणी यांचा बॅंक सखी पुरस्कार देऊन गौरव : सलग तीसऱ्यांदा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार : कोल्हापूर येथील कार्यक्रमात गौरव :
कडेगाव : प्रतिनिधी
बॅंक ऑफ महाराष्ट्र कडेगाव शाखेच्या माध्यमातून जनधन खाते उघडणेसाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बद्दल आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या राबविण्यासाठी कोल्हापूर झोनमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल सौ.करिश्मा दस्तगीर मुलाणी (कडेपूर) यांना कोल्हापूर येथे झालेल्या बॅंकेच्या मेळाव्यात बॅंक सखी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. करिश्मा मुलाणी यांनी आपल्या प्रभावी उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे गेले तीन वर्षे झाले सलग पुरस्कार पटकावले आहेत.
सौ.करिश्मा मुलाणी या कडेगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कडेगाव येथील शाखेत काम करत आहेत. बॅंकेत जनधन खाते उघडणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या सगळ्या योजनांमध्ये काम बघत आहेत. सौ.करिश्मा मुलाणी यांनी गेल्या दोन वर्षांत वरील सर्व योजना प्रभावीपणे राबवत बॅंकेच्या कोल्हापूर झोनमध्ये कडेगाव शाखेची उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्याच पध्दतीने सन २०२२ ते २०२३ मध्ये ही त्यांनी वरील सर्व योजनांसाठी शासनाकडून येणारे उद्दीष्टे पूर्ण करून आदर्श कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन कोल्हापूर येथे झालेल्या बॅंकेच्या मेळाव्यात त्यांना बॅंक सखी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बॅंकेच्या झोनल मॅनेजर के. दुर्गा सुनीता, डेप्युटी झोनल मॅनेजर जीवन पाटील, मोनल खीवरकर, किशोर पाटील, बारट्रोनिक्स कंपनीचे जिल्हा समन्वयक शरद यादव, मोहन साळुंखे, सुनील शेणवी यांच्यासह बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.