कडेगावला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने आयोजित शोभायात्रेला रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद,सेवकांचा सत्कार

कडेगावला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने आयोजित शोभायात्रेला रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद,सेवकांचा सत्कार
कडेगाव : प्रतिनिधी.
अयोध्या येथे नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापणा यासह मंदिराचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.या पार्श्वभूमीवर शहरात आज सोमवारी (ता.22) भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी सर्व नागरिक व रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तर याकामी शहरातील जैन, मुस्लिम यांचेसह सर्व धर्मीय बांधवांचे मोठे सहकार्य लाभले.या निमित्ताने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज,पताका, विविध मंडळे, संस्था यांनी उभारलेले प्रभू श्रीराम यांचे डिजिटल फलक यामुळे संपुर्ण कडेगाव राममय झाले होते.
१८५ वर्षाची परंपरा असलेल्या श्रीराम मंदिरात आज सकाळी ७ वाजता श्री राम व विठ्ठलदेव यास महा अभिषेक व पूजा,सकाळी ८ ते ९.३० या वेळेत गावातील महिलांच्यावतीने श्री राम रक्षा पठण झाले. त्यानंतर 9.30 ते ११ या दरम्यान येथील नामवंत श्रीगोविंद गिरी भजनी मंडळ यांची भजन सेवा झाली.त्यानंतर ११ ते १२.३० या वेळेत श्री क्षेत्र अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्वाना स्क्रीन द्वारे ऑनलाईन दाखविण्यात आले.दुपार नंतर १९९२ साली अयोध्या येथे प्रत्यक्ष जावून कार सेवा करून आलेले कडेगाव शहरातील मुकुंद कुलकर्णी, अनिल देसाई, शिवाजी नांगरे, रघुनाथ गायकवाड, सुनील भस्मे, अविनाश नलवडे, अवधूत विभुते, अर्जुन चन्ने, विठ्ठल माळी, स्व. संजय माळी या १० श्रीराम कार सेवक यांचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख व गुरूवर्य फडणीस सर, नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रभू श्री राम यांची उपस्थित मान्यवर नागरिक यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.
सायंकाळी 4 वाजता भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून हजारो राम भक्त यांच्या उपस्थितीत व खास ढोल पथक,डॉल्बी साऊंड सिस्टीम,नयनरम्य फटाके रोषणाई यासह खास मेघडंबरी रथामधून प्रभू श्री राम यांची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.यावेळी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह संग्राम भाऊ देशमुख, गोपुज कारखान्याच्या अध्यक्षा अपर्णा ताई देशमुख, विश्वसंग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वतेज देशमुख,कराड जिल्हा सर संघचालक डॉ. मकरंद बर्वे, राजाराम गरुड, सभापती अमोल डांगे, विजय गायकवाड, प्रकाश गडळे, दत्तूशेठ सूर्यवंशी, सयाजी चव्हाण,निलेश लंगडे, विजय खाडे, सुधाकर चव्हाण, युवराज राजपूत, बलजीत लोखंडे, इम्तियाज शेख, संजय गायकवाड, संभाजी देसाई, अरुण हवलदार, बबन रासकर, संदीप गायकवाड,जगदीश लोखंडे, हनमंत रासकर, किशोर मिसाळ, मानव परदेशी, यांच्यासह हजारो महिलांची उस्फूर्त उपस्थिती होती. हजारो लोकांच्या उपस्थितीत कडेगाव शहरातील ही पाहिलीच इतकी भव्य शोभायात्रा असल्याचे यावेळी अनेक जेष्ठ नागरिकांनी बोलून दाखवले. रात्री नऊ वाजता सर्व उपस्थित रामभक्त यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास हजारो हिंदु मुस्लिम जैन बांधवांसह सर्व समाजातील ग्रामस्थांसह महिला उपस्थित होत्या.या सोहळ्यामध्ये तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्व जाती धर्माच्या नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केली होती.
…………