आमदार साहेबांचा एक फोन आन् टेंभू योजनेचे पाणी पाटात.
आमदार साहेबांचा एक फोन आन् टेंभू योजनेचे पाणी पाटात.
कडेगांव प्रतिनिधी
नेर्ली, अपशिंगे, कोतवडे ,खंबाळे औंध या गांवाना जानेवारी महीन्यापासून शेतीच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते,
टेंभू उपसा सिंचन योजना चे पाणी आवर्तने वेळेत न सुटल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो गेल्या वर्षी आवर्तने वेळेत न सुटल्यामुळे पीके वाळून गेली होती तसेच पिण्याचे पाणी सुध्दा लोकांना मिळत नव्हते त्यामुळे माजी राज्यमंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी यांची गंभीर दखल घेत टेंभू योजनेचे मुख्य अधिकारी राजन रेड्डी यार यांना फोन लावून तात्काळ पाणी सोडण्याच्या सुचना दिल्या आरदा तासात पाटात पाणी आले.
टेंभू योजनेच्या पाण्याची आवर्तने वेळेत सोडावीत यासाठी नेर्ली खोरे येथील अपशिंगेचे सरपंच भारत सुर्यवंशी,कोतवडे माजी सरपंच प्रकाश यादव, खंबाळेचे सोसायटीचे चेअरमन विजय भोसले,नेर्लीचे माजी सरपंच सुनिल पाटील तसेच इतर कार्यकर्त्यानी भेटून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली त्यावर लगेच आमदार डाॅ .विश्वजीत कदम यांनी टेंभू योजनेचे श्री रेडीयार यांना फोन लावला आणि त्यांना धारेवर धरत ताबडतोब पाणी सोडणेचे आदेश दिले तसेच पूढील पाणी आवर्तने वेळेवर सोडण्यास सांगितले त्यानंतर अर्ध्या तासात टेंभू योजनेचे पाणी नेर्ली खोर्यात सोडण्यात आले त्यामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला .