कडेगाव तालुक्यातील सिमेंट बंधारा बांधणीसाठी १ कोटी 82 लाखाचा निधी : संग्राम भाऊ देशमुख.

कडेगाव तालुक्यातील सिमेंट बंधारा बांधणीसाठी १ कोटी 82 लाखाचा निधी : संग्राम भाऊ देशमुख.
कडेगांव प्रतिनिधी.
कडेगांव तालुक्यातील नवीन सिमेंट बंधारा बांधणीसाठी १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची महिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांनी पत्रकारांशी
बोलताना दिली. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की देशात व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे कोणताही निधी कमी पडून देणार नाहीं.
टेंभू योजनेचे शिल्पकार स्व.संपतराव आण्णा देशमुख यांनी दुष्काळी कडेगाव तालुक्यातील जनतेला पाणी मिळावे यासाठी मंत्रीपदाला लाथ मारून टेंभू योजना पदरात पाडून घेतली. म्हणुन आज हा बदल तालुक्यामध्ये दिसत आहे,सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत अनेक कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला,आज तालुक्यातील काही भागात पावसाळ्यात व टेंभू योजनेच्या आवर्तन सुरू केल्यानंतर पाणी अडविण्यात व साठविण्यात यश येत नव्हते,पाणी वाहून जात होते परिणामी या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नव्हता. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी व्हावा यासाठी सिमेंट बंधारे बांधण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती.
त्यामुळे कोतीज येथे बंधारा बांधणीसाठी २०लाख ७६हजार, येडे येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी ८लाख २०हजार, चिखली येथे सिमेंट बंधारा बांधणीसाठी १७लाख ३०हजार, करांडेवाडी येथे सिमेंट बंधारा बांधणीसाठी २३ लाख ३हजार, कडेपुर येथे साठवण बंधारा बांधण्यासाठी १३ लाख ३ हजार, अमरापूर येथे सिमेंट बंधारा बांधणीसाठी १२ लाख ५५ हजार, कोतवडे येथे सिमेंट बंधारा बांधणीसाठी १८ लाख ६८ हजार,कडेपुर साठवण बंधारा बांधणीसाठी १४ लाख ८० हजार, नेर्ली येथे सिमेंट बंधारा बांधणीसाठी १६ लाख १५ हजार, निमसोड येथे सिमेंट बंधारा बांधणीसाठी २० लाख, उपाळे वांगी येथे सिमेंट बंधारा बांधणीसाठी १७ लाख ५८ हजार असा १कोटी ८२ लाखाचा निधी मंजूर झाला आहे, व तालुक्यातील उर्वरित सिमेंट बंधारा बांधण्यासाठी व पाझर तलावांची दुरुस्ती करण्यासाठी लवकरच जिल्हा नियोजन, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून मंजुरी मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.