तडसरमधील महावितरने बंद डीपी तातडीने सुरु करावेत अन्यथा सोमवारी मोर्चा

तडसरमधील महावितरने बंद डीपी तातडीने सुरु करावेत अन्यथा सोमवारी मोर्चा
कडेगाव / प्रतिनिधी
तडसर(ता कडेगांव) येथे महावितरण संघर्ष समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी तात्काळ बंद केलेले डीपी सुरू करावेत तसेच जुने डीपी तात्काळ दुरुस्त करून जादा डीपी बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सोमवार दि.रोजी कडेगांव महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
महावितरणचे अभ्यासक श्रीदास होनमाने महावितरण संघर्ष समितीचे ऍड दीपक लाड, प्रमोद पाटील, तडसर उपसरपंच सुरज पवार, विराज पवार, चंद्रकांत पाटील, प्रविण पवार,महेंद्र पवार, सचिन पवार प्रमुख उपस्थित होते.
श्रीदास होनमाने म्हणाले की, महावितरणच्या गलथान कारभाराबाबत तात्काळ सुधारणा न झाल्यास जाब विचारू व तडसर गावामध्ये बरेच ट्रान्सफार्मर नादुरुस्त आहेत व अॅडिशनल ट्रान्सफॉर्मर करावे लागत आहेत
याचा तात्काळ सर्वे करून नवीन ट्रान्सफार्मरची जोडणी करावी तसेच डीपीची फ्यूज वारंवार जात आहे कर्मचाऱ्यांनी वसुली न करता फ्यूज व मेंटेनन्सचे काम पार पाडावे, असे ठरले.
यावेळी लक्ष्मण बकाळ,अनुप पवार, ज्ञानदेव पवार, अनिरुद्ध पवार,तानाजी पवार,संदीप पवार यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते