तहसीलदारांच्या उपस्थित कडेपूरच्या बजारवाट रस्त्याला मिळाला चाळीस वर्षे नी न्याय

तहसीलदारांच्या उपस्थित कडेपूरच्या बजारवाट रस्त्याला मिळाला चाळीस वर्षे नी न्याय
कडेगाव- प्रतिनिधी
कडेपूर ता.कडेगाव येथील गेली चाळीस वर्षांपासुन बंद असलेला कडेगाव ते चिखली बजारवाट रस्ता या नकाशामध्ये असलेल्या रस्त्यावरील अंदाजे ३ कि.मी.अतिक्रमण काढुन
तहसीलदार डॉ.शैलजा पाटील यांनी रस्ता खुला केला २२५ एकरातील शेतीमाल व ने-आण करणेसाठी यांचा फायदा होणार आहे.
कडेपुर येथे कडेगाव ते चिखली बजारवाट रस्ता या नकाशामध्ये असुनही काही शेतकऱ्यांनी हा अडवला होता याबाबत वारंवार तक्रार होत होत्या.याबाबत
महाराजस्व अभियान व मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत तहसिलदार डॉ. शैलजा पाटील यांनी जागेवरच सुनावणी घेऊन आदेश पारीत करून जागेवर उभे राहुन रस्ता अतिक्रमण मुक्त केला. सदर रस्त्याचा फायदा जवळपास शंभर खातेदारांना त्यांच्या २२५ एकरातील शेतीमाल व ने-आण करणेसाठी फायदा होणार आहे.याबाबत उपस्थित शेतकऱ्यांनी तहसिलदार यांचे अभिनंदन केले तसेच यापुढे डॉ. शैलजा पाटील यांनी तालुक्यातील सर्व पाणंद रस्ते लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त करू असे आश्वासन दिले. यावेळी मोहनराव यादव,मंडल अधिकारी मल्हारी करांडे,समिर यादव, महादेव यादव, तुषार यादव, राउसाहेब यादव,कासम मुलाणी, राजेश मुलाणी,अधिकराव यादव,विलास घागां,तलाठी जायभाय, कोतवाल प्रदिप कुंभार
आदींसह शेतकरी उपस्थित होते.
