कोतवडे’त रानडुक्कराचे मांस घरी खाण्याकरीता आणले प्रकरणी तिघावर वनगुन्हा
‘कोतवडे’त रानडुक्कराचे मांस घरी खाण्याकरीता आणले प्रकरणी तिघावर वनगुन्हा
कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची कारवाई
कडेगाव, : कोतवडे (ता.कडेगाव) येथे रानडुक्कराचे मांस घरी खाण्याकरीता आणल्याची घटना घडली असून याप्रकरणी संशयित दिलीप गोविंद नांगरे-पाटील (वय-50),दिपक हिंदुराव यादव (वय-60),अमोल शिवाजी यादव (वय-36) यांचेवर कडेगाव-पलूस वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.) कार्यालयात आज वनगुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कडेगाव-पलूस वन परिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,कडेगांव-पलूस वनपरिक्षेत्रा अंतर्गत कोतवडे येथे आज सोमवारी (ता.16) संशयित दिलीप नांगरे- पाटील,दिपक यादव,अमोल यादव यांनी रानडुक्कराचे मांस घरी खाण्याकरीता आणल्याची गुप्त माहिती मिळाली होती.त्यानंतर कडेगाव वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कोतवडे येथे जागेवर जाऊन तपास करून संशयित दिलीप नांगरे- पाटील, दिपक यादव,अमोल यादव या तिघावर वनगुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास उपवनसंरक्षक सांगली निता कट्टे व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सांगली
डॉ.अजित साजणे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण,वनपाल सर्जेराव ठोंबरे, कडेगांव,वनरक्षक सुनिल पवार हे करीत आहेत.
तर कोणताही वन्यप्राणी घरामध्ये,शेतामध्ये, अथवा आपल्या परिसरामध्ये आढळून आल्यास किंवा सापडल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनविभास 1926 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.