महाराष्ट्रराजकीय

प्रगल्भ नेतृत्वगुणांची साक्ष :डॉ. विश्वजित कदम लेख: महाराष्ट्र मल्लसम्राट केसरी पै.रणजीत पवार

प्रगल्भ नेतृत्वगुणांची साक्ष :डॉ. विश्वजित कदम

Download Aadvaith Global APP

लेख: महाराष्ट्र मल्लसम्राट केसरी पै.रणजीत पवार

डॉ. विश्वजित कदम यांनी राजकारण आणि समाजकारणाचा आपल्या वडिलांकडून लाभलेला समृद्ध आणि संपन्न वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात. डॉ. विश्वजित कदम यांनी १८ व्या वर्षी पलूस-कडेगावच्या राजकारण आणि समाजकारणात प्रवेश केला. विटा येथे डॉ. पतंगराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी प्रचारसभेत केलेले भाषण त्यांच्या प्रगल्भ नेतृत्वगुणांची साक्ष आहे.

डॉ. पतंगराव कदम आणि आमदार मोहनराव (दादा) कदम, मातोश्री श्रीमती विजयमाला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विश्वजित कदम यांनी सदैव सामान्य माणसांच्या मदतीसाठी काम केले. पलूस, कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची शेती करता यावी आणि त्यांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने २००३ साली डॉ. विश्वजित कदम यांनी हिंगणगाव खुर्द येथे ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ आमदार मोहनशेठ कदम यांच्या नावाने लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय सुरू केले.
विश्वजित कदम यांनी २००६ साली स्त्रीभ्रूण हत्येविरोधात मुलगी हवी हो, हे अभियान सांगली जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले आणि जनजागरण केले. या कामाची जाणकारांनी महाराष्ट्रभर दखल घेतली. २००७ साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. त्याकाळात राज्यभर दौरे करुन पक्षबांधणीसाठी मोलाचे योगदान दिले. २००८ मध्ये युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध उपक्रमातून युवक कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले.

डॉ. विश्वजित कदम यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली असताना देखील त्यांनी विनम्रपणे नाकारत पलूस-कडेगाव मतदारसंघातल्या सामान्य माणसांसाठी सेवेतच राहण्याचे ठरविले. यातूनच आपल्या मतदारसंघाविषयी वाटणारी आत्मियता आणि जिव्हाळा दिसून येतो. आजवर केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पक्षाने महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री म्हणून निवड केली. २०१३ मध्ये ५३२ किलोमीटरची पायी बुलढाणा ते सांगली अशी सात जिल्ह्यातून संवाद पदयात्रा काढून शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या वेदना/भावना जाणून घेतल्या.
विदर्भातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने १९३४ कोटी रुपये निधी जाहीर केला.


अगदी कोवळ्या वयात भारती विद्यापीठाच्या पालकत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आली आणि काळाची पावले ओळखत समर्थपणे पुढे नेत आहात. ही वाटचाल करीत असताना आपले वडील पतंगराव कदम यांचा प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी त्यांना वाटणारी कणव, आव्हानांना धीराने सामोरे जाण्याची वृत्ती आणि मातोश्री विजयमाला यांची शिस्तप्रियता, माणसे जोडण्याची वृत्ती, कलात्मक दृष्टी यांचे बाळकडू आपल्याला संस्काररुपाने लाभले. महाराष्ट्रातील जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न धसास लावून त्याला त्याची उत्तरे/ मदत करण्याचे काम आपण सातत्याने आणि निष्ठेने केले आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील देदीप्यमान वाटचालीसाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा!

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App