क्राईममहाराष्ट्र

मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने कडेगाव तालुक्यात हाय अलर्ट

मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने

Download Aadvaith Global APP

कडेगाव तालुक्यात हाय अलर्ट

 

कडेगाव 

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कडेगांव तालुक्यात आली असल्याचे अफवेमुळे तालुक्यात हाय अलर्ट सुरू झाला आहे . शालेय विद्यार्थी भिंतीच्या छायेत असुन शाळा व्यवस्थापनानेही मुलांना काळजी घेण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

 

         २८ सप्टेंबर पासुन सोहोली ता. कडेगाव येथील लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न झालेबद्दलची बातमी सोशल मिडीयावरती फिरत आहे.हि बातमी खरी समजुन या अनुषंगाने अनेक गावात अफवेचे पेव फुटले यात भर म्हणजे काही शाळा व्यवस्थापनानेही मुलांना काळजी घेण्याचे आवाहन केले यामुळे अफवेत भर पडत मुलांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले.

            सदर सहोली येथिल बातमीचे अनुषंगाने कडेगाव पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अधिकारी पथकाने सोहोली ता. कडेगाव येथे जावुन सदर बातमीची खात्री केली असता काल रात्री ८.१५ वाजणेचे सुमारास गावातील दोन मुली एकीचे वय १४ वर्षे व दुसरीचे वय १० वर्षे या एका दीड वर्षाच्या मुलासोबत दुर्गादेवीची आरती करुन आपले घराकडे परत येत असताना त्यांना त्यांचेपासून सुमारे २५० ते ३०० फुटावरती दोन महिला अंधारातुन जाताना दिसलेने सदर मुलींना अंधारातुन जात असणा-या महिला या धरुन घेऊन जाणारे टोळीतील असल्याचा भास झाल्याने त्या मुली भीतीने दुस-या रस्त्याने घरी परतल्या व घडलेला प्रकार घरातील लोकांना सांगितला, त्यानंतर गावातील युवकांनी सदर महिलांचा गावात शोध घेतला असता गावात संशयास्पद कोणी आढळून आले नाही. परंतु सदरचे घटना सोशल मिडीयावरती व्हायरल झालेने पालकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन मुले पळवून नेलेबाबतच्या अफवा पसरवल्या जात आहेत. असे असले तरीही सर्व पालकांनी आपल्या मुलांचेबाबत दक्षता व काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.अफवेमुळे मात्र कडेगाव तालुक्यात हाय अलर्ट आहे.

 

कडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिक व पालकांनी अशा कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता अशा अफवाबाबत स्वतः खात्री करुन घ्यावी अथवा कडेगाव पोलीस ठाणेशी संपर्क साधावा. सोशल मिडीयावरती अशा प्रकारची कोणतीही अफवा पसरवु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल याबाबत नोंद घ्यावी.

 

पांडुरंग भोपळे

 

पोलीस निरिक्षक कडेगांव 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App