कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार

कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार
“राष्ट्रीय मतदार दिनी होणार सन्मान :
मतदार नोदणीतील उत्कृष्ट कामगिरीची दखल”
कडेगाव :
मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जन जागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेबद्धल मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचेकडून
कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना उत्कृष्ट
कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय
पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २५ जानेवारी रोजी चर्चगेट मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात डॉ.गणेश मरकड यांचा “उत्कृष्ट अधिकारी’ पुरस्काराने सन्मान होणार आहे.
मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जन जागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिका-यांचा सन्मान सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड निवड
करण्यात आली आहे.उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचेकडून गणेश मरकड यांना
उत्कृष्ट अधिकारी पुरस्कारासाठी निवड झालेबाबतचे पत्र मिळाले आहे.
गणेश मरकड यांचे प्रशासन तसेच
पलूस कडेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.