संजय गांधी निराधार योजना समितीच्या कडेगांव अध्यक्षपदी महेंद्र मोहनराव पवार

संजय गांधी निराधार योजना समितीच्या कडेगांव अध्यक्षपदी महेंद्र मोहनराव पवार
: संग्राम देशमुख यांच्या हस्ते सर्व नुतन सदस्यांचा सत्कार
कडेपूर : प्रतिनीधी
कडेगाव संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी महेंद्र मोहनराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष पवार व सर्व नुतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कडेगांव तालुका संजय गांधी निराधार योजना समिती ची घोषणा नुकतीच पालकमत्र्यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्या शिफारसीनुसार, जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या समितीच्या अध्यक्षपदी महेंद्र मोहनराव पवार यांची निवड करण्यात आली. यांच्यासह अन्य सदस्यांमध्ये मनोहर भिकु सकट,सौ. अनिता संजय यादव, पांडुरंग वसंत कटरे, राजाराम तुकाराम कुंभार, धनाजी हणमंत बाबर, हणमंतराव पंढरीनाथ कदम, दादासो पांडुरंग यादव, संदिप पोपट यादव, मुकुंद वासुदेव कुलकर्णी, यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी नुतन अध्यक्ष व समिती सदस्यांचे अभिनंदन केले. देशमुख म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेपासून तालुक्यातील एकही पात्र व्यक्ती वंचित रहाता कामा नये, हे एक पुण्याईचे काम आहे. आपल्याकडे कोण येतील हे न पाहता समितीच्या प्रत्येक सदस्याने निकषास पात्र असणाऱ्या प्रत्येक निराधार व्यक्तीपर्यंत पोहचावे. शासनाने हि योजना सुरू करताना फार मोठा उद्देश ठेवला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
संग्राम भाऊ देशमुख यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या अगदी त्याच तळमळीच्या भावनेने प्रत्येक गरजू पर्यंत पोहचून त्याला लाभ देण्याचा प्रयत्न करु आपली जी निवड करण्यात आली आहे ती कामातून सार्थ ठरवू अशी ग्वाही संजय गांधी निराधार योजना समितीचे नुतन अध्यक्ष पवार व समितीतील सर्व सदस्यांनी
यावेळी दिली.