टाळ मुदुंगाच्या गजर अभंगाची साथ तडसर मध्ये गणेशाचे आगमन

टाळ मुदुंगाच्या गजर अभंगाची साथ तडसर मध्ये गणेशाचे आगमन
कडेगांव:प्रतिनिधी
डाल्बीने आरोग्य धोक्यात आले आहे.पारंपारीक वाद्य कलबाह्य होउन डाल्बीला मागणी वाढत आहे तरुणाई बेभान होऊन नाचते परंतु जिल्ह्यात आदर्श निर्माण करत तडसर येथिल अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने गणनरायाचे स्वागत टाळ मुदुंगाच्या गजरात व अभंगाने केले आहे. यावेळी तरुण अबाल वृद्ध भजणात दंग झाले होते.गणपती बाप्पा मोरया, ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हनत तडसर गावात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पांढरी वस्त्रे, डोक्याला टोपी व गळ्यात टाळ घेऊन गणरायाची स्वागत मिरवणूक काढली यावेळी गावातील भजणी मंडळ सामील झाली होती.
यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सचिव संजय पवार, दिलीप तोडकर,बाळकृष्ण पवार बाबासो परीट, वसंत सुतार, बाळासाहेब परीट, भाऊसाहेब नरुले, अँड.मनोज इनामदार,अनिल पवार, रविंद्र पवार आदींनी अभंग गायले . यावेळी अष्टविनायक गणेश मंडळ छत्रपती संभाजी राजे मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कडेगांव शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेशोचे उत्साहात आगमन झाले झांज पथक व बॅण्ड यांच्या निनानाद आगमन झाले तडसर येथेल अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने टाळ मुदुंगाच्या गजरात गनरायाचे आगमन केले.