विद्युत मोटार व केबल चोरणारी टोळीचा कडेगांव पोलिसांनी केला पर्दाफाश,दोन अटक

विद्युत मोटार व केबल चोरणारी टोळीचा कडेगांव पोलिसांनी केला पर्दाफाश,दोन अटक
कडेगांव :
कडेगांव शहरासह कडेपुर परिसरात मागील काही दिवसापासून सतत होत असलेल्या विद्युत मोटार व विद्युत केबल वायर चोरीचा अखेर कडेगांव पोलिसांनी पर्दाफाश केला.या प्रकरणी संशयित आरोपी अनिल बाळू चव्हाण (21),काशिनाथ राजू चव्हाण (22 दोघे राहणार लक्ष्मी मंदिर शेजारी कडेगांव )यांना कडेगांव पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत कडेगांव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , दिनांक 7 ते 8 जुलै रोजी कडेपुर ता येथील जयदीप संपतराव देशमुख (54) यांच्या मालकीचे श्री समर्थ शेती माल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादीत कडेपुर ता कडेगाव या कंपनीचे फॅक्टरीचे गोडावून चे शटरचे कुलुप तोडुन फॅक्टरीमधील विद्युत मोटार व वायरिंग चोरून नेले होते .याबाबत 12 जुलै रोजी कडेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झालेपासुन गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा पोलिसांचा कसोशिने प्रयत्न चालु होता.दरम्यान 16 जुलै रोजी आमवस्या अनुषंगाने नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन असल्याने सपोनि संतोष गोसावी व पोलीस स्टाफ असे कडेगाव एस. टी. स्टँड समोर नाकाबंदी करुन संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना यातील संशयीत आरोपी अनिल व काशिनाथ हे संशयीतरित्या त्यांचे ताब्यातील मोटारसायकल गाडी नंबर एम एच 10 डी आर 1850 या गाडीवरुन संशयीतरित्या एक इलेक्ट्रीक मोटर घेवुन जात होते .यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवुन त्यांचेकडे विचारपुस करता ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यांचेकडे कसून तपास केला असता तसेच त्यांचे ताब्यातील इलेक्ट्रीक मोटर बाबत पोलीस ठाणेकडील रेकॉर्ड तपासणी करुन खात्री केली असता सदरची मोटर हि कडेगाव पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील चोरीस गेली असल्याची खात्री झाल्याने सदर इलेक्ट्रीक मोटर व मोटर सायकल हि दोन पंचासमक्ष पंचनाम्याने जप्त करण्यात आली आहे.
त्यानंतर सदर आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेवुन त्यांचेकडे पोलीस कस्टडी मध्ये कौशल्याधारित तपास करता त्यांनी कडेगाव पोलीस ठाणे हददीमध्ये मोटर चोरी व केबल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली . त्यांचेकडे सखोल चौकशी केल्यानंतर 3 लाख 85 हजार किंमतीच्या 4 इलेक्ट्रीक मोटर व 2 मोटर पंप, कडेगांव नगरपंचायत पाणी पुरवठा विहिरी करणारी 2 हजार फूट विद्युत केबल वायर असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींचेकडुन आणखीन मोटर चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आरोपींचेकडे अधिक तपास करीत आहोत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. गोसावी , पोलीस फौजदार अधिकराव वनवे , पोहेकॉ सतिश मुळे, शिवाजी माळी, आशिष जाधव, प्रविण पाटील, पुंडलिक कुंभार, सागर निकम, संदिप जाधव,संकेत सावंत उमेश तुपे यांनी केली आहे.