ताज्या घडामोडी

कडेगावमध्ये एकाकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल जप्त,सहोलीचा तरुणास अटक

कडेगावमध्ये एकाकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल जप्त,सहोलीचा तरुणास अटक

Download Aadvaith Global APP

सांगली एलसीबीची कारवाई

 

कडेगांव प्रतिनिधी 

 

कडेगाव येथे देशी बनावटीची पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

 

सूरज जगन्नाथ मोहिते (वय २१, रा. सहोली, ता. कडेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्री. शिंदे यांनी खास पथक तयार केले होते. पथकाला एक तरूण देशी बनावटीची पिस्तूले विक्री करण्यासाठी कडेगाव येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. 

 

पथकाने कडेगाव येथील एमआयडीसी येथे सापळा रचून सूरज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन देशी बनावटीची पिस्तूले, तीन काडतुसे जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

 

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, उदयसिंह माळी, विक्रम खोत, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, सोमनाथ गुंडे, संदीप गुरव, सागर लवटे, बिरोबा नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App