महाराष्ट्रराजकीय

आमदार मोहनराव कदम यांच्या फंडातून  २४ गावांना ट्रॅक्टर चलीत पाण्याच्या टाक्या प्रदान” आ. डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते वितरण

आमदार मोहनराव कदम यांच्या फंडातून  २४ गावांना ट्रॅक्टर चलीत पाण्याच्या टाक्या प्रदान”

Download Aadvaith Global APP

आ. डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते वितरण : लोकाभिमुख कामाचे कौतुक  

कडेगाव : प्रतिनिधी 

आमदार मोहनराव कदम  यांच्या स्थानिक विकास निधीतून  कडेगाव तालुक्यातील २४ गावांना   नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा सोयीकरिता ट्रॅक्टर चलीत पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या.५० लाख रुपयांच्या निधीतून  २४ गावांना २४ टाक्या  प्रदान करण्यात आल्या.

     वांगी तालुका कडेगाव येथील डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना येथे 

डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मारक परिसरातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी सहकार व कृषि राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते  कडेगाव तालुक्यातील २४

गावांमधील सरपंच ,ग्रामसेवक व सदस्य यांच्याकडे

५  हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी आमदार मोहनराव कदम ,सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम,युवा नेते डॉ.जितेश कदम आदी उपस्थित होते.

यावेळी हिंगणगाव (बुद्रुक), उपाळे (मायणी),येतगाव,नेवरी,खेराडे (वांगी),सोनसळ,चिंचणी, सोनकीरे, मोहित्यांचे वडगाव,आसद,हिंगणगाव(खुर्द),शिरसगाव,विहापुर,शाळगाव,वांगी,वडिये रायबाग,हणमंत वडिये,कडेगाव,रामापूर,अमरापूर,देवराष्ट्रे,शिवाजीनगर,नेर्ली, तडसर या गावांना पाण्याच्या टाक्या  देण्यात आल्या.

यावेळी आमदार डॉ.विश्वजीत कदम

म्हणाले टंचाई परिस्थितीत  नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच गावांमधील 

विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी पिण्याच्या aपाण्याची सोय करण्यासाठी या टाक्यांचा उपयोग होणार  आहे.आमदार मोहनराव कदम यांनी सातत्याने लोकाभिमुख कामे करून आदर्श घालून दिला आहे.

  यावेळी सुहास  शिंदे,जितेंद्र भाऊ पाटील ,आनंदराव नलवडे, सुजय शिंदे,सोनहीराचे संचालक पी सी जाधव,बापूसाहेब पाटील,निवृत्ती जगदाळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव,सुरेश निर्मळ-थोरात आदींसह सर्व गावांमधील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App