ताकारी योजनेचे पाणी सुरू- कार्यकारी अभियंता राजन डवरी

ताकारी योजनेचे पाणी सुरू- कार्यकारी अभियंता राजन डवरी
कडेगांव :
ताकारी योजनेचे यंदाच्या उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन तात्काळ सुरु करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
यावर्षी ताकारी योजनेचे रब्बी आवर्तन ६ डिसेंबर ते १४ जानेवारी असे ४० दिवस सुरु होते. त्यानंतर पहिले उन्हाळी आवर्तन १५ फेब्रुवारी ते ११ एप्रिल अखेर ६० दिवस सुरु होते. या दोन्ही पाण्यानी कडेगांव, खानापूर, तासगांव आणि पलूस तालुक्यात लाभक्षेत्रातील गावांत पाणीटंचाई दूर केली होती. सध्याचा कडक उन्हाळा आणि वाढलेल्या सिंचनक्षेत्रासाठी जमिनीतून होणारा अमर्याद पाणीउपसा यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत चालली आहे. जलस्त्रोत आटू लागले आहेत. काही प्रमाणात टंचाई जाणवू लागली आहे. ताकारीच्या पाण्याला उशीर झाल्यास पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊन पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतक-यांतून व्यक्त होत होती. यासाठी ताकारीचे पाणी लवकर सुरु करावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
योजनेचे पाणी सुटल्याने शेतकरी वर्ग आनंद व्यक्त होत आहे.