कडेगाव तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस,बारा मजुर जखमी,

कडेगाव तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस,बारा मजुर जखमी,
कडेगाव प्रतिनिधी :
कडेगाव तालुक्यात दुपारी 3 वाजता विजांच्या कडकडासह मुसळधार स्वरुपाच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावली.त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.परंतु वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे कडेगांव येथे मजुरांचे शेड उडाल्याने 13 मजुर जखमी झाले असून सुमारे 35 लाखाचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात शेतकरी उन्हाळी पावसाच्या प्रतीक्षेत होते.तर कालपासून कडक ऊन पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.आज दिवसभरही कडक ऊन पडले होते.तर दुपारी 3 च्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरु झाला अन पावसाला सुरुवात झाली.यावेळी कडेगांव वांगी नेर्ली,खंबाळे औध,अपशिंगे,कडेगाव,कडेपूर,सोहोली, चिखली,अमरापूर,तडसर आदी गावात मध्यम ते मुसळधार पावसाने तासभर हजेरी लावली.
ऊस पिकांना लाभदायक ठरला.त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
♦
आज कडेगांव शहरात अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी व बाजारकरी नागरिकांची येथे एकच धावपळ उडाली यात आले काढण्यासाठी आलेले सुमारे 45 मजूर कडेगाव येथील भाड्याच्या शेडमध्ये राहत होते अवकाळी पाऊस व सोबत वादळ आल्याने हे शेड उडून गेले यात पायल सुभाष राठोड
शालुभाई सुभाष राठोड
अनिता सुभाष राठोड
सानिया गजानन जाधव
पुष्पा गजानन जाधव
कविराज गजानन जाधव
सुनिता गजानन जाधव
मानुबाई राजू जाधव
संध्या राजू चव्हाण
आनंदी राजू चव्हाण
श्रीशैल जयहिंद बगली
कामु कोळी
शिणू राठोड हे 13 मजूर जखमी झाले असून यातील संसार उपयोगी साहित्य व शेडचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मजुरानी केली आहे
.तर रात्री विजेचा लपंडाव सुरु असल्याने बाजारात व्यापारी व नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.