राजकीय

विटा बाजार समिती निवडणूक ,काँग्रेसने आघाडीच्या वज्रमुठीला दिली मूठ माती भाजपा शिवसेना सोबत थाटला संसार!

विटा बाजार समिती निवडणूक ,काँग्रेसने आघाडीच्या वज्रमुठीला दिली मूठ माती भाजपा शिवसेना सोबत थाटला संसार!
कडेगाव /लोकभावना न्युज 
कडेगाव खानापूर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती विटा च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस भाजपा व शिवसेना एकत्र आली असुन महाविकास आघाडीची वज्रमुठ सोडुन काँग्रेसने मित्र पक्ष राष्ट्रवादीच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. विटा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात होते. परंतु या निवडणुकीत माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम शिवसेनेचे आमदार अनिल बाबर भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी नेते एकत्र आले असून ही निवडणूक नेहमीप्रमाणे बिनविरोध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु राष्ट्रवादीने याला खो देत निवडणूक लढवत असुन 17 जागेसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत.यात दोन अपक्ष तर हमाल तोलाई गटातुन आघाडीचा उमेदवार बिनविरोध विजय झाला आहे.

Download Aadvaith Global APP

१८ जागेसाठी दोन्ही तालुक्यातून 116 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते यात 79 जनांनी आपली तलवार म्यान केली आहे.
कडेगाव व खानापूर या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विटा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती एकच असल्याने खानापूर व कडेगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांचा एकोपा या बाजार समिती निवडणुकीमध्ये दिसून येतो. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सेना युती अशी लढवली जाणार अशी शक्यता होती.परंतु काँग्रेसने राष्ट्रवादी विरोधातच रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसने भाजपा व शिवसेना( ठाकरे गट) यांच्याबरोबर आघाडी करत १० काँग्रेस भाजप व शिवसेना 8 अशी बेरीज लावत निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. कडेगाव खानापूर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी असल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाण्यास नकार दिला असल्याचे बोलले जात आहे काँग्रेस व शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्याकडे सर्वाधिक मतदान असल्याने भाजपला सोबत घेत देशमुख ,कदम ,बाबर हे तिन्ही नेते एकत्र आले आहेत.
बाजार समितीची निवडणूक ही बहुतांश वेळा बिनविरोधच होत असते परंतु 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सावता सुभा मांडल्याने काही जागेवर निवडणूक लढवण्यात आली यात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस ,भाजपा व शिवसेना एकत्र आले होते काँग्रेसचे नेते मोहनराव कदम ,माजी मंत्री विश्वजीत कदम ,आमदार अनिल बाबर भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी एकत्र बसून 2015 च्या निवडणुकीत जागावाटप करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला यात काँग्रेस 9, शिवसेना 7 भाजपा 1 व राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती सध्या प्रक्रिया संस्थे गटातून एक जागा रद्द झाल्याने व हमाल गटातुन शिवसेनेचे संतोष कदम बिनविरोध विजय झाल्याने आता 17 जागेसाठी निवडणूक होत आहे. सध्या काँग्रेसला 1 जागा जास्त दिली .बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने का होईना कदम,बाबर, देशमुख यांची मैत्री मात्र पुन्हा घट्ट होत आहे. गावा गावच्या राजकीय पुढाऱ्यांनी आता मांडीला मांडी लावून मतांची बेरीज मारलेली पहावयास मिळेल यात कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांचा बोध घेणे गरजेचे आहे.

तालुका निहाय मतदार संख्या
दोन्ही तालुक्यातील एकूण मतदार 3174

सोसायटी गट एकूण मतदार 14 66 खानापूर 657 कडेगाव ८०९ ग्रामपंचायत गट एकूण मतदार 11 34 खानापूर 592 कडेगाव 542 व्यापारी गट एकूण मतदार 525 खानापूर 373 कडेगाव 152 हमाल तोलाई गट एकूण मतदान 49 खानापूर 38 कडेगाव 11
चोकट..
उमेदवारांच्यात नाराजी
विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस, भाजपा ,शिवसेना, राष्ट्रवादी राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु हे तिन्ही नेते एकत्र आल्याने अनेक उमेदवारांना माघारी घेण्याची नमुशकी आली नेत्यांचा आदेश मानुन अनेकांनी माघारी घेतली परंतु यात नाराजीचा सूर दिसत होता.

निवडणूकीच्या रिंगणात असणारे उमेदवारी अर्ज – सोसायटी गट जागा : ११

सर्वसाधारण – शरद शामराव मोरे(अमरापूर), सुनिल सोपान जगदाळे(अंबक). सुरेश तानाजी पाटील ( खेराडे), अविनाश नामदेव जाधव (आळसंद), जगन्नाथ दत्तू सुर्वे( खंबाळे), रामचंद्र नामदेव जाधव(सुलतानगादे), मारूती सुभाष पाटील (शिवाजीनगर). सचिन तानाजी शितोळे (विटा), संदीप बाबासाहेब मुळीक (रेवणगांव). राजाराम रामचंद्र निकम (भाळवणी), शहाजी धर्मा मोरे (नेवरी), सयाजी यशवंत माने (माहुली), राजेंद्र बबन जाधव (कुंभारगांव), सुशांत सुनिल पाटील (अंबक)-

इतर मागास प्रवर्ग फिरोज शिरास शेख(लेंगरे), सिद्धेश्वर बाबुराव धावड

(मादळमुठी).

भटक्या जाती विमुक्त जमाती विजय पंढरीनाथ होनमाने(वांगी), महादेव सुखदेव रूपनर (अमरापूर), महिला सुनंदा वसंत ढणबर (बलवडी (मा.)). – सिंधुताई हणमंतराव मोहिते (वांगी), मिनाज सिकंदर मुल्ला (नेर्ली), शोभा गोरख

कदम (वासुंबे). ग्रामपंचायत गट जागा : ४

सर्वसाधारण विश्वनाथ रावसाहेब काटकर(भूह), शिवाजी शामराव पाटील (बेलवडे), उत्तम बाळकृष्ण जाधव (आसद). संभाजी गणपती बाबर (येडे). अर्थिक दुर्बल भगवान जगन्नाथ नलगे कुंभारगांव), सचिन सुधाकर कुंभार

(रेवणगांव).

अनुसुचित जाती (पारे). रमेश विश्वनाथ मिसाळ( देवराष्ट्रे) उत्तम आनंदा सावंत,

व्यापारी गटातून जागा : २ अनिल लक्ष्मण हराळे आणि महेंद्र आनंदराव कदम (विटा), विकास मोहनराव माने( खानापूर).

हमाल गटात जागा १. संतोष दशस्ता कदम (बिनविरोध)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App