ताज्या घडामोडी

टोलनाका सुरू करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन

 

Download Aadvaith Global APP

टोलनाका सुरू करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन

कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी ऐस देशमुख, कडेगाव मधील व्यापारी अभिमन्यू वरूडे यांच्या हस्ते प्रांताधिकारी गणेश मरकड साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की
प्रस्तुत कराड- विटा चारपदरी महामार्ग क्रमांक 166 E मधील सुरली घाट रस्त्याचे काम हे चार पदरी मागणी असताना सदर सुरली घाटामधील काम हे दुपदरी च झालेले आहे. सदर घाट रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी व अपघात होत आहेत.
सबंधित विभागास व प्रशासनास सुरली घाटाचे काम चार पदरी होण्यासाठी यापुर्वी अनेक वेळा लेखी पाठपुरावा केला आंदोलन ही केले, परंतु सुरली घाट रस्त्याचे काम दोन पदरी पूर्ण झाले. तसेच सदर महामार्ग कामातील रस्त्यावरील टोलनाका उभारणीचे काम येवले वाडी (ता. कडेगाव) येथे पूर्ण होत आले आहे.तरी सदर सुरली घाटा- मधील चार पदरी रस्त्याचे काम पूर्ण करेपर्यंत टोल आकारणी केली जाऊ नये.
सदर कडेगाव- कराड महामार्गावरील गतिरोधक ज्याप्रकारे लावण्यात आले आहेत ते चार चाकी वाहनांचे नुकसान , दुचाकी स्वारांच्या पाठीच्या मणक्याचे दुखणे निर्माण करणारे आहेत तरी त्वरित त्यावर योग्य ती उपाययोजना होणे गरजेचे आहे.
कराड विटा महामार्ग करताना पूर्वी ची असणारी झाडे तोडली आहेत त्यामुळे महामार्ग भकास झाला आहे. संबंधित विभागास एस्टिमेट प्रमाणे झाडे लावण्याचे आदेश देण्यात यावेत. व सबंधित विभागाने झाडाचे संगोपन करणे आवश्यक आहे. कडेगाव स्टँड परिसर चौकात रात्री अंधार पडत आहे, तिथे हायमास्ट लैम्प तात्काळ बसविण्यात यावेत सुरू करून द्यावेत. सुरली घाटात व कडेगाव शहर परिसरात नाल्याचे अपूर्ण
कामे तात्काळ पूर्ण करावीत.
अर्जाचा विचार न करता टोलनाका सुरू केल्यास कडेगाव तालुक्यातील नागरिक यांच्या वतीने टोल नाक्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणार्‍या परिणामास शासन प्रशासन व टोल प्रशासन जबाबदार राहील. यावेळी पाणी उपस्थित प्रविण करडे, राहुल चन्ने, अतुल नांगरे, अप्पा यादव, मोहन जाधव, बजरंग अडसूळ, नामदेव रासकर, आरिफ तांबोळी व मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App