महाराष्ट्रराजकीय

पलुस-कडेगाव साठी १५ कोटीचा निधी: पालकमंत्री  डॉ.सुरेश खाडे

पलुस-कडेगाव साठी १५ कोटीचा निधी: पालकमंत्री 
डॉ.सुरेश खाडे.

Download Aadvaith Global APP

भाजपा कार्यकर्ता मेळाव्यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश.

कडेगांव /प्रतिनिधी.

माझ्या घरामध्ये कोणीही राजकारणात नसतानाही मी आज आमदार,मंत्री,पालकमंत्री या पदावर आहे हे सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून गेल्यामुळेच भाजपामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय हा मिळतच असतो. आज पालकमंत्री या नात्याने सर्वच तालुक्यांना विकासासाठी चांगला निधी उपलब्ध केला आहे. पलूस-कडेगाव हा मतदार संघ जरी छोटा असला तरी आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा च्या मागणीनुसार पलूस कडेगाव साठी 15 कोटी चा भरघोस निधी दिल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी केले. ते कडेगाव या ठिकाणी भाजपा कार्यकर्ता मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष मा. आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, चंद्रसेन देशमुख, कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, राजाराम गरुड,दत्तूशेठ सूर्यवंशी मंदाताई करांडे, अमोल डांगे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख म्हणाले की या तालुक्याचे रूप टेंभूच्या पाण्यामुळे बदलले आहे. आज प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे हे फक्त टेंभू ताकारी योजनांना दिले गेलेल्या निधीमुळे शक्य झाले आहे व हा निधी देवेंद्र फडवणीस यांनी दिला म्हणूनच हे शक्य झाले आहे.
संग्राम भाऊ देशमुख म्हणाले की हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आहे शेतकऱ्याला केंद्र सरकारच्या सहाय्यता निधीप्रमाणे आता राज्य सरकार ही मदत करणार आहे, एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे, राज्य सरकार हे पैसे भरणार आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. आमच्या मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फळी आमच्या सोबत आहे ती कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही, त्यामुळेच येणाऱ्या विधानसभेला या मतदारसंघांमध्ये भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले.
यावेळी सौ.संजीवनी डांगे यांची भाजपा कडेगाव तालुका महिला अध्यक्षपदी तर रविराज घाडगे यांची भाजपा गुंठेवारी विकास समिती सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


यावेळी अमोल जाधव, अण्णासो पवार, राहुल मोहिते, उमेश आटे, अर्जुन मोहिते, अरबाज तांबोळी, सोहेल तांबोळी, सचिन चन्ने, राहुल चन्ने यांच्यासह आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरेश खाडे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी सभापती अमोल डांगे, निलेश लंगडे, शुभदा देशमुख, विद्या खाडे, दीपा चव्हाण,मनीषा रजपूत, नजमाबी पठाण, नाजनीन पटेल,राजाराम शिंदे, प्रकाश गडळे, तानाजी जाधव, बाबासो शिंदे, माणिक मोरे, सतीश जाधव, महेंद्र पवार,रामचंद्र महाडिक, रवींद्र कांबळे, बबन माने, बिरू मस्के, सद्दाम मुल्ला, अशोक साळुंखे, लक्ष्मण शिंदे, सयाजी चव्हाण, सयाजी कदम, प्रदीप शेवाळे,तुकाराम शिंदे, यांच्यासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App