कडेगाव तालुक्यात वादळातिल दिव्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूकीत लढलेले खरे योद्धे आहेत : आमदार अरुणअण्णा लाड

कडेगाव तालुक्यात वादळातिल दिव्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूकीत लढलेले खरे योद्धे आहेत : आमदार अरुणअण्णा लाड
कडेगाव:प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यात वादळात दिवा लावून ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले आणि लढलेले हेच खरे योद्धे आहेत, भविष्यात कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तिसरा पर्याय म्हणून कामातून उभे राहू
असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले ते कुंडल (ता पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड समाधीस्थळी कडेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लढलेल्या आणि जिंकलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कडेगाव तालुका पक्ष निरीक्षक सुशांत देवकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, कडेगाव तालुक्यातील पाणी योजनांना अप्रत्यक्ष रित्या जी.डी.बापूंनी गती दिली त्यामुळेच आज कडेगाव तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. म्हणजे कडेगाव तालुक्याची आजची प्रगती ही जी. डी. बापूंच्या दुरदृष्टीमुळेच आहे.
कडेगाव तालुक्यातील नगरपंचातीत राष्ट्रवादी काँग्रेसला जमेत न घेतल्याने कसा फटका बसला हे सर्वांनीच पाहिले त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही गृहीत धरू नये आम्हाला विचारात घ्यावेच लागेल असे खडे बोल त्यांनी सुनावले.
सत्तेवरील मुजोर लोकांना सामान्यांचे काहीही देणेघेणे नाही, कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या मताचा टक्का वाढला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा जी.डी.बापूंची कार्यशक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी शरद लाड म्हणाले, कडेगाव तालुक्यात जिगरबाज कार्यकर्ते आहेत, त्यांनीच ही निवडणूक हातात घेतली होती,आम्ही फक्त त्यांना बळ दिले आशा लढवैया कार्यकर्त्यांमुळे कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे भविष्य उज्वल आहे. या तालुक्यात काही नेते ऊसाभोवती राजकारण फिरवतात पण आपण यापुढे कडेगाव तालुक्यात लागेल ती सुविधा देऊ, फक्त आम्हाला काम सांगा. भविष्यातील सर्व निवडणुका आपण ताकदीने लढवू.
कार्यक्रमाचे स्वागत विराज पवार यांनी केले, प्रास्ताविक जयदीप यादव यांनी केले तर आभार सुरेश शिंगटे यांनी मानले.
यावेळी महिला तालुकाध्यक्ष वैशाली मोहिते, रमेश एडके, प्रणिता पाटील, पूजा लाड, युवराज पाटील, तानाजी जाधव, आप्पासाहेब जाधव, यांचेसह कडेगाव तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.