नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मधुमेह व रक्तदाब तपासणी

नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मधुमेह व रक्तदाब तपासणी
कडेगावः
कडेगाव शहरातील लोकप्रिय नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त किरण मेडिकल शॉपी यांच्या वतीने मोफत मधुमेह तपासणी व प्राथमिक ब्लड प्रेशर तपासणी नगरपंचायत कडेगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्याबद्दल भाजप जिल्हा अध्यक्ष मा.आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वतीने किरण मेडिकल चे मालक अभिमन्यू वरुडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी असंख्य नागरिकांनी मधुमेह व रक्तदाब तपासणी चा लाभ घेतला,यावेळी किरण मेडिकल शॉपी तर्फे गरजू रुग्णांची तपासणी करून आहारा विषयी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कडेगाव नगरपंचायत येथे यावेळी असंख्य नागरिक नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांना शालेय साहित्य भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघटना अध्यक्ष हिराजी देशमुख, युवा नेते उदयसिंह देशमुख,उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, नगरसेवक पै.अमोल डांगे, निलेश लंगडे, नगरसेविका सौ.रंजना लोखंडे, सौ.विदया खाडे,सौ. नाजनिन पटेल,सौ. दिपा चव्हाण,सौ.नजमाबी पटेल, सौ.मनिषा राजपूत,श्रीमंत शिदे,आशपाक पठाण, संदिप गायकवाड, मूकतार पटेल, मनोज भस्मे, जगदीश लोखंडे, विजय खाडे, सुधाकर चव्हाण, आशरफ तांबोळी, रियाज इनामदार, मारुती माळी, रोहीत देशमुख, यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.