महाराष्ट्रराजकीय

सांगली जिल्ह्यातील १२ हजार कार्यकर्ते भारत जोडोत….डॉ.विश्वजित कदम यांचा पुढाकार

सांगली जिल्ह्यातील १२ हजार कार्यकर्ते भारत जोडोत….डॉ.विश्वजित कदम यांचा पुढाकार

Download Aadvaith Global APP

 

:कडेगाव
एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए अपना वतन’ही थीम घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातुन मार्गक्रमण करीत आहे.या यात्रेत सांगली जिल्ह्यातील १२ हजार कार्यकर्ते टप्प्या टप्प्याने सहभागी होत आहेत.या नियोजनात अग्रेसर असलेले पलूस कडेगावचे आमदार डॉ.विश्वजित कदम स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालण्याचा निर्धार करून सहभागी झाले आहेत.


भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने डॉ.विश्वजित कदम यांच्या बुलडाणा ते सांगली पदयात्रेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
जनतेशी संवादाची तार जोडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड ,हिंगोली,वाशीम,अकोला, बुलढाणा जिल्ह्यातुन जात असली तरी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्तेही या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.विशेष म्हणजे या यात्रेत
विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील ४ हजार कार्यकर्ते सहभागी होत आहेत. डॉ.विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किमीची संवाद पदयात्रा काढली होती. सन २०१३ मध्ये ११ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत”एक पाऊल संवेदनेचे दुष्काळाच्या सावटातून सावरण्याचे”ही टॅग लाईन घेऊन निघालेल्या संवाद पदयात्रेच्या आठवणी भारत जोडो यात्रेच्यानिमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या आहेत.या यात्रेत सहभागी झालेले बहुतांशी कार्यकर्ते आता पुन्हा भारत जोडो यात्रेतसहभागी होण्यासाठी रवाना झालेआहेत.सन २०१३ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि व राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या सत्ताकाळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या आदेशानुसार डॉ.विश्वजित कदम यांनी ही पदयात्रा काढली होती.यावेळी पदयात्रेच्या माध्यमातून मांडलेले दुष्काळ ग्रस्तांचे ज्वलंत प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आले.ती संवाद पदयात्रा बार्शी येथे आली असताना राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशीसंवाद साधला होता. आता तरदस्तुरखुद्द राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असल्याने कार्यकर्ते अधिक उत्साहाने या यात्रेत सहभागी होत आहेत.

ती संकल्पनाही राहुल गांधींची :
सन २०१३ मध्ये विश्वजित कदम
यांना दुष्काळी भागातून संवाद यात्रा
काढण्याच्या सूचनाही
राहूल गांधी यांनी दिल्या होत्या.युवक काँग्रेसने दुष्काळग्रस्तांच्या व्यथा दुष्काळी भागात जाऊन जाणून घ्याव्या . सरकारच्या
माध्यमातून दुष्काळग्रस्तांचे
प्रश्न सोडविले जावे अशी राहुल गांधींची त्यामागे संकल्पना होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App