महाराष्ट्र

येरळा नदीपात्रातून वांगीत यारीच्या सहाय्याने पुन्हा वाळू तस्करी सुरू पथके गायब 

येरळा नदीपात्रातून वांगीत यारीच्या सहाय्याने

Download Aadvaith Global APP

पुन्हा वाळू तस्करी सुरू

पथके गायब 

 

कडेगांव: प्रतिनिधी

 

 

वांगी (ता. कडेगाव) येथे येरळा नदीपात्रातून यारीच्या सहाय्याने वाळू तस्करी जोमाने सुरू आहे. परिसरात वाळू माफियां मुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.त्याच बरोबर शेतकऱ्यांची नदीपात्रात असणाऱ्या वीहीरीच्या केबल पाईप ची मोठ्याप्रमाणात मोडतोड केली जात आहे .बंद असलेली वाळु सुट्टी दिवस पाहुन पुन्हा सुरू झाली आहे.वाळु विरोधी पथके गायब आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

 

 

 प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असतानाही  वाळूतस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे .

         नदीपात्रातून यारी, जेसीबी, डंपर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, पिकअप आदी वाहनांच्या साहाय्याने बेसुमार अवैध वाळू उपसा केला जात आहे. जेसीबीच्या साहाय्याने उपसा केला जात असल्याने नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेतकऱ्याच्या नदी पात्रात शेतीच्या पाण्यासाठी रिंग ( लहान विहीर ) आहेत. याचा जवळचाच वाळू उपसा केला जात असल्यामुळे विजेची केबल, पीव्हीसी पाईप आदींचे मोठे नुकसान होत आहे.

 

रिग जवळच वाळु उपसा केल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. 

 

 

 येरळा नदीच्या वाळूला सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांकडून मोठी मागणी असल्यामुळे येथील वाळूला सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे परीसरातील अनेक तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी बेकायदा वाळू चोरीत उतरले आहेत.

 

 महसूल प्रशासनाने जुजबी कारवाई करण्यापेक्षा येथील वाळू तस्करी कायमची बंद करण्यासाठी कठोर करवाई करावी. या मागणीसाठी शेतकरी प्रांताधीकारी यांना भेटलेआहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App