चिंचणी -अंबक येथे बैलगाडी शर्यतीला उदंड प्रतिसाद आ.मोहनराव कदम व डॉ.शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन : तब्बल ३२८ नामवंत बैलगाड्यांचा थरार
चिंचणी -अंबक येथे बैलगाडी शर्यतीला उदंड प्रतिसाद
आ.मोहनराव कदम व डॉ.शिवाजीराव कदम यांच्या
वाढदिवसानिमित्त आयोजन : तब्बल ३२८ नामवंत बैलगाड्यांचा थरार
कडेगाव :
राज्यात सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील राज्य सरकारने बंदी उठवली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मोहनराव कदम व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचणी -अंबक तालुका कडेगाव येथे आज पार पडल्या.बैलगाडा शर्यत शौकीनांनी ही शर्यत पाहायला प्रचंड गर्दी केली होती. इतर जिल्ह्यातूनही या शर्यतीसाठी बैलगाडा मालक आणि शौकिनांनी या शर्यतीला आपली उपस्थिती लावली होती.लाखाचे बक्षीस असणाऱ्या बैलगाडा शर्यतीत तब्बल ३२८ नामवंत बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रथम सहा क्रमांक विजेत्या बैलगाडा मालकांना सोनहीरा केसरी किताब देऊन गौरविण्यात आले.
राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम व सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते दिग्विजय कदम यांनी शर्यतीचे आयोजन केले होते बैलगाडी शर्यतीचा मैदानावर बॅरिकेट
लावून प्रेक्षकांसाठी सुरक्षित व्यवस्था केली होती.एकाच वेळी आठ बैलगाड्या शर्यतीमध्ये धावल्या. या शर्यती पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.पहिल्या फेरीत प्रत्येकी ८ प्रमाणे ४१ गटात बैलगाड्या धावल्या . उपांत्य फेरीत प्रत्येकी ६ प्रमाणे ७ गटात बैलगाड्या धावल्या .अंतिम फेरीला उशीर झाल्याने या फेरीत
प्रवेश केलेल्या आठ बैलगाडी मालकांना राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते चिठ्या टाकून अनुक्रमे ९ बक्षिसे देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर सोनहीरा खोऱ्यात प्रथमच मोठया स्वरूपातील बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला.या शर्यतीचा हा थरार ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आला.
यावेळी आ राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम,आमदार मोहनराव कदम,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, युवा नेते दिग्विजय कदम,हर्षवर्धन कदम, भूषण नाईक आदींसह मान्यवर व बैलगाडी शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनहीरा केसरीचे बैलगाडी शर्यतीचे अनुक्रमे ९ मानकरी :
१) देवांग पाटील- सुपने
२) हाँटेल दरबार -करवडी
३)शिवामृत- चरेगाव
४)अविनाश कदम -दुधोंडी
५)स्वामी समर्थ प्रसन्न-म्हासोली
६)युवराज पाटील-कराडकर
७)अजय मोरे-कोडोली सातारा
८)माऊली फौजी – खुटाळवाडीकर
९)शारदा पाटील-पुणे