क्रीडा व मनोरंजनदेश विदेशमहाराष्ट्र

235 किमी सायकल प्रवास अवघ्या साडे आठ  तासांत पूर्ण करुन ते पोचले विठ्ठल दर्शनास…

235 किमी सायकल प्रवास अवघ्या साडे आठ  तासांत पूर्ण करुन ते पोचले विठ्ठल दर्शनास…

Download Aadvaith Global APP

कडेगाव : संपादकीय
सायकलचा वापर पुन्हा वाढावा, या दृष्टिकोनातून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणभिमुख वाहन म्हणून सायकलकडे पाहिले जाते. सायकलचा वापर करा हा संदेश देण्याच्या निमित्ताने  भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. सुहास मोहिते (रा.मोहित्यांचे वडगाव ता. कडेगाव) वय ४४ यांचेसह संगणकशास्त्रातील प्रा.अरुण पवार (बेलवडे ता. कराड )वय  ४५ या दोघांनी  8तास30 मिनिटात 235 किमीचा पुणे-पंढरपूर प्रवास  करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्रा.सुहास मोहिते  व प्रा.अरुण पवार हे दोघे दि.18 जुन रोजी पहाटे 4 वाजता पुणे येथून सायकलने  निघाले आणि दुपारी १२ .30 देहु- हडपसर- यवत- भिगवण- इंदापुर- टेम्भुर्णि मार्गे पंढरपूरात विठ्ठल दर्शनासाठी पोचले. या सायकलवारीत एकूण 1057 सायकल वारकरी सहभागी झाले होते.

यापुर्वी पुणे ते मोहित्यांचे वडगाव असा १८८  किमी  प्रवासाचे लक्ष्य त्यांनी साडे नऊ तासात पूर्ण केले होते . .
सायकल चालविण्याच्या परंपरेत मानाचा तुरा रोवताना प्रा.सुहास मोहिते व प्रा. अरुण पवार यांनी पुणे-पंढरपूर
सायकलिंगचा सरासरी वेग प्रतिताशी 27ते 28 किमी असा होता. यापूर्वी  त्यांनी लांब पल्ल्याचे सायकलिंग करीत १०० ते १५०  किमीचा प्रवास अनेकदा केला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोतसवी वर्षानिमित्त भारती विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या 140 कि मी च्या सिंहगड ते रायगड सायकल रैलीत देखील सहभागी झाले होते.
भारती विद्यापीठ पुणे येथे प्रशासकीय अधिकारी व यशवंतराव मोहिते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. सुहास मोहिते व संगणक शास्त्रातील प्रा.अरुण पवार हे दैनंदिन व्यवहारात सायकलला प्राधान्य देतात.अजूनही लांब पल्ल्याचे सायकलिंग करण्याचा त्यांचा मनोदय आहे.पुणे येथे ते दररोज १० ते १५  किमी धावणे व सायकलिंग असा व्यायाम करतात.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App