राजकीय

कडेगाव तालुक्यातील ४३ गावच्या ग्रामपंचायतीवर प्रशासक,सरपंच कार्यकाळ संपुष्टात ! 

कडेगाव तालुक्यातील ४३ गावच्या ग्रामपंचायतीवर प्रशासक,सरपंच कार्यकाळ संपुष्टात ! 

Download Aadvaith Global APP

कडेगांव: लोकभावना न्युज

कडेगाव तालुक्यात  ४३ गावातील  ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल ऑक्टोबर मध्ये पूर्ण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक,सरपंच कार्यकाल संपुष्टात आला आहे.

 

 काही दिवसातच या ४३ गावात  निवडणूकीचे पडघम पाहायला मिळणार आहे. सध्या शासनाच्या माध्यमातून निवडणुका असणाऱ्या गावातील मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. नोव्हेंबर मध्ये  कोणत्याही परिस्थितीत निवडणूका होणार हे निश्चित मानले जात आहे निवडणुकीला महिन्याचा कालावधी असताना सध्या  गावागावात राजकीय घडामोडीना वेग आला आहे.

           सध्या गावागावात या  निवडणुका अंत्यंत चुरशीच्या व संघर्षाच्या सुरु   आहेत .त्यातच ग्रामपंचायत निवडणूका काही महिन्यावर येऊन ठेपल्याने पुन्हा एकदा गावा-गावात राजकीय वातावरण  पाहायला मिळणार आहे.त्यांमुळे गावोगावच्या भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या  आसद, कुंभारगाव, देवराष्ट्र,सोनसळ,पाडळी,मोहिते-वडगाव,अपशिंगे, अमरापूर, खंबाळे औंध,  तडसर, निमसोड, नेर्ली,आंबेगाव, खेराडे-विटा, ,तुपेवाडी ये,नेवरी, भिकवडी खुर्द,येवलेवाडी, हणमंतवडीये, ,उपाळे मायणी, ,कारंडेवाडी,येडे,रायगाव,

 

,विहापूर, शाळगाव,सोहोली, हिंगणगाव बुद्रुक,वांगी,

 

रेणुशेवाडी,हिंगणगाव खुर्द या गावात सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम गटाची सत्ता आहे.

तर कडेपूर,कोतवडे,शिरगाव,चिखली,शिवाजीनगर,खेराडेवांगी,उपाळेवांगी,बेलवडे, ,तोंडोली,बोबाळेवाडी,शेळकबाव,

 

या गावात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे.त्यामुळे पुन्हा एकदा या  ठिकाणी आपले वर्चस्व  प्रस्थापित करण्यासाठी कदम – देशमुख कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे .    

 

            गावपातळीवर होणारी ही ग्रामपंचायतीची निवडणूक भावकी , पै-पाहुणे व मित्र – मंडळी यांच्या संबंधावर होत असते . त्यांमुळे या निवडणुकीत जिरवा – जिरवीचे व पाडापाडीचे राजकारण दडलेले असते . गावापातळीवर होणाऱ्या  या निवडणूकांवर  विधानसभा निवडणूकीचे गणिते अवलंबून असतात .  त्यांमुळे  गावापातळीवरील या निवडणुकीला  एक वेगळे महत्त्व  असते. त्यामुळे राजकीय  नेतेमंडळीकडून  या निवडणूकीसाठी  आर्थिक रसद पुरविली जाते. 

या गावात  प्रशासक…

 

आसद, कुंभारगाव, देवराष्ट्र,सोनसळ,पाडळी, शिरगाव, मोहिते-वडगाव अपशिंगे, अमरापूर, कडेपूर, कोतवडे, खंबाळे औंध, चिखली, तडसर, निमसोड, नेर्ली, शिवाजीनगर, आंबेगाव, खेराडे-विटा, खेराडेवांगी,तुपेवाडी ये,नेवरी, भिकवडी खुर्द,येवलेवाडी, हणमंतवडीये, वडीयेरायबाग,उपाळे मायणी, उपाळे वांगी,कारंडेवाडी, बेलवडे, सासपडे,तोंडोली,बोबाळेवाडी,येडे, रायगाव, रेणुशेवाडी,विहापूर, शाळगाव,सोहोली, हिंगणगाव-बुद्रुक,वांगी, शेळकबाव, हिंगणगाव खुर्द 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App