अपशिंगेत २ कोटी ६८ लाखच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संग्रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते संपन्न.

अपशिंगेत २ कोटी ६८ लाखच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संग्रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
कडेगांव प्रतिनिधी.
देशात, राज्यात अनेक शेतकरी व लोक हिताचे निर्णय सरकार घेत आहे, अनेक शेतकऱ्यांना
५० हजाराचे अनुदान मिळाले, तर प्रत्येक वर्षी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून मदत मिळत आहे, आता राज्य सरकारही लवकरच शेतकऱ्यांना मदत करणारा आहे,लोकहिताचे निर्णय सरकार घेत आहे,आता राज्यात व देशात भाजपचे सरकार आहे, तुम्हा सर्वांच्या मतदानरुपी आशीर्वादाने आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली, या पाच वर्षांमध्ये मा.आ.पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली अपशिंगे साठी २ कोटी ६८ लाखाचा भरघोस निधी दिला व या पुढे हि अपशिंगे गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सुतोवाच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांनी केले, ते अपशिंगे ता.कडेगाव या ठिकाणी त्याच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या व विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
यावेळी कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, शांताताई कनुजे, मंगलताई क्षीरसागर, मंदाताई करांडे, बाबासो शिंदे, सदापंच सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, हनमंत सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी, तेजस सूर्यवंशी,संजय साठे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे देशमुख म्हणाले की अपशिंगे गावाला खूप मोठा भ्रष्टाचारी इतिहास आहे. हे गाव सुधारले नाही पाहिजे यासाठी अनेक पाणीपुरवठा योजना, रस्त्यांसाठी आलेला करोड रुपयांचा निधीचा भ्रष्टाचार करण्यात आला,हे गाव प्रादेशिक मध्ये होते तरीही आम्हीं शर्तीचे प्रयत्न करून या गावातील प्रत्येक व्यक्तीला मानसी ५५लिटर शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन मधून ही योजना मंजूर केली.आता यापुढे अपशिंगे मधील प्रत्येक ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी महेंद्र पवार,चंद्रकांत पाटील,चंद्रकांत मोरे, धोंडीराम भोसले, विश्वनाथ कदम, नानासो भोसले,शहाजी सूर्यवंश, सिकंदर मुजावर, अक्षय करांडे,विकास भोसले,गणेश भोसले, बापूराव पवार, देवेंद्र शिंदे,बजरंग सूर्यवंशी,ज्योतीराम सूर्यवंशी, वसंत सूर्यवंशी,सर्जेराव सूर्यवंशी,संजय सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी,विकास सूर्यवंशी,बाळासाहेब सूर्यवंशी, सूर्यकांत सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.