महाराष्ट्रराजकीय

आज देवराष्ट्रे ते सोनहीरा कारखाना काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा’ आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजन :यशवंतराव चव्हाण स्मारक ते डॉ. पतंगराव कदम स्मारक असा प्रवास 

आज देवराष्ट्रे ते सोनहीरा कारखाना काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा’

Download Aadvaith Global APP

आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजन :यशवंतराव चव्हाण स्मारक ते डॉ. पतंगराव कदम स्मारक असा प्रवास 

 कडेगाव – 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसच्या वतीने संपुर्ण देशात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यासंदर्भात आलेल्या सूचनेनुसार कडेगाव तालुक्यात

आज मंगळवार दिनांक  ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष  आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे येथील स्मृतीस्थळ ते 

माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांचे सोनहीरा कारखाना परिसरातील समाधीस्थळ अशी ९ किमी  आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव  यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना  दिली. 

आझादी गौरव पद यात्रेच्या नियोजनासंदर्भात नुकतीच कडेगाव तालुका  कॉग्रेस कमिटीची बैठक पार पडली.यावेळी कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव बोलत होते.यावेळी  उपाध्यक्ष सुनील जगदाळे यांच्यासह  सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .

यावेळी प्रकाश जाधव म्हणाले  पदयात्रा भव्य स्तरावर व्हावी असे ठरविण्यात आले आहे.कडेगाव तालुक्यात  ९  किलोमीटरची ही पदयात्रा होणार आहे.यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम,जेष्ठ काँग्रेस नेते आमदार मोहनराव कदम,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत,जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील,महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील,काँग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,

सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम,युवा नेते डॉ.जितेश कदम, दिग्विजय कदम यांच्यासह  जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

दुपारी १२ वाजत काँग्रेस नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते 

सोनहीरा कारखाना सर्कल चौकात 

एकत्र येणार आहेत.

दुपारी १ वाजता स्व.यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ  देवराष्ट्रे  येथून  पदयात्रा निघणार असून मोहित्यांचे वडगाव मार्गे  ,चिंचणी ते  सोनहीरा

कारखाना असा पदयात्रेचा मार्ग निश्चित केला असून दुपारी ३ वाजता स्व.डॉ.पतंगराव कदम समाधीस्थळ सोनहीरा कारखाना येथे 

ही पदयात्रा पोहोचणार आहे.यानंतर

सोनहीरा कारखाना परिसरातील 

सोनहीरा मल्टिपर्पज हॉलमध्ये

जाहीर सभेने पदयात्रेची सांगता होणार आहे. असे प्रकाश जाधव यांनी सांगितले.यावेळी कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App