देश विदेशमहाराष्ट्र

कडेगावात मोहरम उत्साहात साजरा पावसामुळे गगनचुंबी ताबूतांचा प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न

कडेगावात मोहरम उत्साहात साजरा
पावसामुळे गगनचुंबी ताबूतांचा प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न
कडेगाव : 
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव जि
. सांगली येथील मोहरम कोरोना नंतर प्रथमच उत्साहात साजरा झाला.मात्र पावसाअभावी ताबूत मिरवणूक व भेटीला फाटा देत उत्सुदच्या माध्यमातून ताबूतांचा प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला.
मोहरम निमित्त सकाळी 10.30 वा पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाचा गजरात वाजत गाजत मानाचा सात भाई ताबूत जवळ प्रथम फातेहा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला.त्यांनतर मानाचा सात भाई ताबूतचा उत्सुद घेऊन, देशपांडे, हकीम , बागवान ,शेटे ,पाटील ,अत्तार ,इनामदार ,तांबोळी , सुतार ,माईनकर , मसूदमातासह आदी ताबूत व पंजे बारा इमाम पंजे वगैरे ठिकाणी फातेहा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला .यावेळी प्रतिकात्मक भेटी सोहळा पाटील वाडा व मुख्य सोहळा सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान येथे संपन्न झाला.

Download Aadvaith Global APP


कडेगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहेत.येथील मोहरांची परंपरा वेगळी आहे.या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात.त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात. मोहरम निमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.
परंतु मागील दोन वर्षात कोरोना या महामारीच्या संकटामुळे मोहरम सण शांततेत पार पडले होते.यावर्षी मोहरम सण उत्साहात साजरा झाला .मात्र मागील दोन दिवसात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लाकडी बांबू व मातीच्या साहाय्याने बनवलेले गगनचुंबी ताबूतांचा गळा भेटी व मिरवणूक सोहळ्याला फाटा देत प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम,आमदार मोहनराव कदम,आमदार अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख ,जिल्हा परिषदेचे गट नेते शरद लाड ,सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ जितेश कदम ,प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ शैलजा पाटील , उपविभागीय अधिकारी पोलीस पदमा कदम , आदींनी ताबूताना भेटी दिल्या. दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.

भाविकांमध्ये निराशा..
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व गेल्या दोन शतकापासून सुरू असलेल्या मोहरम व गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळ्याकरिता हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती.मात्र पावसामुळे ताबूतांची मिरवणूक व गळा भेट रद्द झाल्याने उपस्थित भाविकांमध्ये निराशा पसरली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App