महाराष्ट्र

कडेगावात श्री.स्वामी समर्थ महाराज मठात गुरु पौर्णिमा    साजरी 

 

Download Aadvaith Global APP

 

कडेगावात श्री.स्वामी समर्थ महाराज मठात गुरु पौर्णिमा    साजरी 

 

 

कडेगाव :

 

 

कडेगाव येथील श्री.स्वामी समर्थ मठात  ट्रस्टच्या वतीने श्री. स्वामी समर्थ मठात गुरु पौर्णिमे निमित्त मूर्तीवर भाविकांच्या उपस्थित दुग्धाभिषेक,पुष्पवृष्ठी,पूजा

 

तसेच महाआरती करण्यात आली.यावेळी श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या ग्रंथाचा पारायण सोहळा पार पडला. तसेच श्री. स्वामी समर्थ मठातील सेवेकरी ह. भ. प. रेणुशे महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर मंदिरात दिवसभर भजनाचा कार्यक्रम सुरु होता. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ  लागली होती.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी भाविक  महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ :कडेगाव :येथील श्री. स्वामी समर्थ मठात पारायण वाचन करताना महिला भाविक.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App