आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांत मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता:गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांत मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता:गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी

Download Aadvaith Global APP

कडेगाव/ प्रतिनिधी

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांत मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता आहे.हिंगणगाव बुद्रुक प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या तीन विद्यार्थीनींची नवोदय विद्यालयासाठी झालेली निवड ही त्यांचा पाया भक्कम झाल्याने झाली आहे.असे मत गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी व्यक्त केले.

 

नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थीनींचा हिंगणगाव बुद्रुक प्राथमिक शाळेत सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर चिमटे,मुख्याध्यापक रघुनाथ जगदाळे,शुभांगी जाधव,पोपट जाधव यांची उपस्थिती होती.

 

विस्तार अधिकारी चिमटे म्हणाले,शाळेने स्काॅलरचे वर्ग तयार करुन शिक्षकांबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.विद्यार्थ्यांनी जिद्दीने,चिकाटीने परिश्रम घेवून यश संपादन केले ही गोष्ट अभिमानास्पद आहे.

 

प्रारंभी,विलासराव आपटे यांनी विद्यार्थीनींच्या अभ्यास व कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली.स्वरा महादेव तोडकर,रश्मी रमेश जाधव,संस्कृती अमोल हुमे या विद्यार्थीनींचा यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास महादेव तोडकर,निकिता जाधव व पालकांची यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संयोजन विलासराव आपटे यांनी केले.आभार महादेव तोडकर यांनी मानले.

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App