राजकीय

भाजपाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा:  पृथ्वीराज देशमुख

भाजपाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा:

Download Aadvaith Global APP

 पृथ्वीराज देशमुख

 

भाजपाची सांगली जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न.

सांगली: लोकभावना न्युज

        काही दिवसात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे ताकतीनिशी प्रयत्न करत आहे. भाजपा हाच पक्ष सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत असतो. सरकार आपले आले आहे कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून भाजपाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवा या मुळे विजय निश्चित होईल, हेच पक्षासाठी मोठे योगदान राहील असे प्रतिपादन भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा.आमदार पृथ्वीराज(बाबा)देशमुख यांनी केले ते भाजपाच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये टिळक स्मारक मंदिर सांगली या ठिकाणी बोलत होते.

     यावेळी खासदार संजय(काका)पाटील,आ. गोपीचंद पडळकर,पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे , माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. राजेंद्र आण्णा देशमुख, माजी आ. भगवानराव साळुंखे, निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक प्रमुख उपस्थित होते.

      या बैठकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवीन सरकारचा अभिनंदनचा ठराव मांडला या ठरावाला माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी अनुमोदन दिले. इस्लामपूरचे नगर माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये असा ठराव मांडला या ठरावाला मा.आ.राजेंद्र देशमुख यांनी अनुमोदन दिले. सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत या संपादन केल्याबद्दल गणेश गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला.

       या बैठकीमध्ये बूथ कमिट्या सक्षमरित्या पूर्ण करून ताकतीनिशी येणार्‍या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

      या वेळीं जि.प.मा.अध्यक्ष प्राजक्ता ताई कोरे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, मा.आ.विलासराव जगताप,मा.आ.राजेंद्रअण्णा देशमुख, मा.आ. भगवानराव साळुंखे,सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश साबळे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद कोरे,सुरेंद्र चौगुले, नितीन पाटील, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष परशुराम नागरगोजे, युवा मोर्चा रोहित पाटील, अल्पसंख्याक मोर्चा आझम मकानदार, तालुका अध्यक्ष धनंजय देशमुख, ,सुनील पाटील,अनिल बाबर, शंकर शिंदे, हनमंतराव पाटील, , सुहास पाटील, धैर्यशील मोरे,जनार्दन पाटील, उमाजी सलगर, जिल्हा पदाधिकारी विद्याताई पाटील,लता पडळकर, स्वप्निल पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App